कृषी केंद्रामधून बोगस बियाणांची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:24 AM2021-07-01T04:24:33+5:302021-07-01T04:24:33+5:30
जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची ...
जिल्ह्यात मानसून दाखल होताबरोबर केशोरी परिसरात मृग नक्षत्र लागल्या दिवसापासून पावसाला सुरुवात झाली. काही शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील धान पिकाची कापणी केल्याबरोबर पऱ्हे टाकले होते. त्यांची धानाची पऱ्हे उगवली नाही. परंतु काही शेतकऱ्यांनी पावसामुळे पऱ्हे टाकणे जगत नसल्यामुळे घाई-घाईने कृषी केंद्रामधून धानाची बियाणे घेऊन पऱ्हे भरून पेरणी आटोपली. यादरम्यान कृषी केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. पेरणीची घाई न करता बियाणांची उगवण क्षमता पडताळून बियाणे खरेदी करणे शेतकऱ्यांनी अपेक्षित होते. बियाणे कंपन्याच्या जाहिरातीवर आकर्षित न होता बियाणांची खात्री करूनच बियाणे खरेदी करणे आवश्यक असताना पेरणीचे हंगाम आटोपण्याच्या घाई-घाईने बऱ्याच शेतकऱ्यांनी कृषी केंद्रामधून खरेदी केलेली बियाणे १०० टक्के उगवली नसल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याची ओरड होत आहे.