जलयुक्त शिवारच्या कामातील मुरुमाची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 11:13 PM2018-03-04T23:13:49+5:302018-03-04T23:13:49+5:30
सिहोरा व चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येणाºया गावातील तलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येत आहेत.
आॅनलाईन लोकमत
चुल्हाड (सिहोरा) : सिहोरा व चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत येणाºया गावातील तलावाचे खोलीकरण जलयुक्त शिवार योजनेतून करण्यात येत आहेत. तलाव खोलीकरणात निघालेल्या मुरूमाची गावात विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार रनेरा गावात उघडकीस आला आहे.
सिहोरा जिल्हा परिषद क्षेत्रातंर्गत रनेरा, चुल्हारडोह व चुल्हाड गावात तलावाचे खोलीकरण, पाणघाट, मत्स्य तलावाच्या कामांना जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. या गावातील तलाव खोलीकरणासाठी ७२ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रनेरा गावात तलाव खोलीकरणाचे कामे याच योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आले असून जेसीबीने कामे सुरु आहेत. तुमसर-बपेरा राज्य मार्गालगत असलेल्या तलावाचे खोलीकरण करताना मुरूम लागला. हा मुरूम शासकीय कामासाठी देण्याची तरतुद आहे. या मुरूमाने शेत शिवारातील पांदन रस्ते होऊ शकतात. परंतु रनेरा गावात पांदण रस्त्यांवर मुरुम टाकण्यात आला नाही. गावात या मुरुमाची विक्री करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामपंचायत पदाधिकाºयात अंसतोष आहे.
गावात तलाव खोलीकरणाचे कामे सुरु असले तरी मुरुम आधी शासकीय कामांना दिले जात नाही. शिवाय खाजगीरित्या मुरुमाची विक्री करण्यात येत आहे. या मुरुमातून गावाचा विकास साधता येऊ शकतो.
- कोमल टेंभरे, सरपंच रनेरा
तलाव खोलीकरणातून निघालेला मुरुम पांदन रस्त्यावर टाकण्यात आला आहे. गावे विकासात सहकार्याची भुमिका घेतली जाईल.
- के. जी. फुलसुंगे, कंत्राटदार कर्मचारी रनेरा