बनावट हमीपत्राने जनावरांची विक्री, ३.८० कोटींनी शासनाची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 11:02 AM2024-11-27T11:02:29+5:302024-11-27T11:05:46+5:30

Bhandara : पाच गोशाळांच्या ३३ संचालकांविरूद्ध लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल

Sale of animals with fake guarantee, defrauding the government of 3.80 crores | बनावट हमीपत्राने जनावरांची विक्री, ३.८० कोटींनी शासनाची फसवणूक

Sale of animals with fake guarantee, defrauding the government of 3.80 crores

लोकमत न्यूज नेटवर्क 
भंडारा :
गोंदिया, नागपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्यांतील विविध पोलिस ठाणेअंतर्गत सन २०१८ ते आजपावेतोच्या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेली जनावरे पोलिसांनी पाच गोशाळांमध्ये जमा केली होती. परंतु, पाच गोशाळांनी न्यायालयाचे आदेश न घेता बनावट हमीपत्रांवर परस्पर जनावरे विकून शासकीय मालमत्तेची अफरातफर केली. शासनाची ३ कोटी ८० लाख ५५ हजारांने फसवणूक केली. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी पाच गोशाळांच्या ३३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


जिल्ह्यात सन २०१८ ते आजपावेतो जनावरांची कत्तलीसाठी अवैधरीत्या वाहनांमधून वाहतूक करताना पोलिस दलाकडून पकडून कारवाई केली जाते. वाहनात कोंबून क्रूरपणे वाहतूक होत असलेल्या जनावरांची मुक्तता करून त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी गोशाळांमध्ये दाखल केले जाते. मात्र, या जनावरांना गोशाळांमध्ये सुरक्षित वातावरणात ठेवले जात नाही, याबाबत भंवरलाल जैन यांनी राज्य मानवी हक्क अधिनियमानुसार तक्रार केली होती. तक्रारीवर भंडारा स्थानिक गुन्हे शाखेद्वारे चौकशी करण्यात आली. यात मोठे घबाड उघड झाले. 


भंडारा, गोंदिया, नागपूर व गडचिरोली जिल्हा पोलिसांनी २०१८ पासून वेळोवेळी कारवाई करून अवैध जनावरांच्या वाहतुकीतून पकडलेली जनावरे वेगवेगळ्या गोशाळांमध्ये पाठवली होती. पकडलेली जनावरे अन्नपूर्णा गौरक्षण संस्था, भवानी गोशाळा, निर्मल गोशाळा, सुखरूप गोशाळा पिंपळगाव सडक आणि मातोश्री गोशाळा रेंगेपार-कोहळी या गोशाळांना सोपविलेली होती. मात्र, गोशाळांच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेली जनावरे न्यायालयाचा आदेश प्राप्त न करता बनावट हमीपत्र लिहून परस्पर विकली. या प्रकरणात ३ कोटी ८० लाख ५५ हजार रुपयांची जनावरे विकून शासकीय मालाची अफरातफर केली आहे. 


याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक आशिष चिलांगे यांच्या चौकशी अहवालावरून लाखनी पोलिसांनी पाचही गोशाळांच्या एकूण ३३ जणांवर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ४०६,४२०,४६७,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव करीत आहेत. 


यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल 
याप्रकरणात लाखनी पोलिसांनी ३३ जणांवर गुन्हा दाखल केला. त्यामध्ये मंगेश राघोते (४०), विनोद बेहरे (४२), धनंजय दिघोरे (४३), मनोज राघोर्ते (४०), अजय मेश्राम (४५), सविता भुते (४०), झांसी राघोते (४२), राजेश्वर कमाने (४३), माणिक जिवतोडे (४०), नाना जिवतोडे (४२), भागवत शिवणकर (४१), भोपेश ब्राह्मणकर (४२), धनराज दिघोरे (४२), दिनेश भाजीपाले (४०) प्रभाकर जिवतोडे (४०), सुरेश कापगते (४१), शिवराम गिरेपुंजे (४२), पांडुरंग कापगते (४२), यशपाल कापगते (३८), शंभूभाई पटेल (४२), राकेश सार्वे (४२), ओमप्रकाश लांजेवार (४०), भास्कर भोतमांगे (४०) सचिन नागलवाडे (४५) ओमप्रकाश भोतमांगे (४१), शामराव चारमोडे (४२), नरेश पिंपळशेंडे (४३), मंगेश तरोणे (४०), कैलास काळसर्पे (४२), राकेश कटाणे (४२) विनोद भोंडे (४३) वामन कमाने (४०), रवींद्र काळसर्पे (४२) सर्व रा. पिंपळगाव/सडक यांचा समावेश आहे.

Web Title: Sale of animals with fake guarantee, defrauding the government of 3.80 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.