सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

By admin | Published: June 21, 2017 12:23 AM2017-06-21T00:23:06+5:302017-06-21T00:23:06+5:30

खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे.

Sales Offices Order for six Agricultural Centers | सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

सहा कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश

Next

भरारी पथकाची कारवाई : बियाणे विक्रीत आढळली अनियमितता
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीपाचा हंगाम सुरु झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांची बि बियाणे खरेदीसाठी लगबग सुरु झालेली आहे. या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांना कमी दर्जाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रकार कृषी केंद्र संचालकांकडून होत असतो. त्यामुळे भरारी पथकाने कृषी केंद्राची तपासणी केली असता सहा केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आल्याने त्यांना विक्रीबंदचे आदेश बजावले आहे.
भंडारा येथील मे श्री साई कृषी केंद्र, बोरगाव येथील मे राधाकृषी केंद्र, बारव्हा येथील लोथे कृषी केंद्र, बारव्हा येथील कृषी साधना कृषी केंद्र, दिघोरी मोठी येथील श्रीराम कृषी केंद्र व लाखांदूर येथील पुर्ती कृषी केंद्रांवर ही कारवाई करण्यात आली आहे. कृषी हंगामात मागील वर्षी वर्धा जिल्ह्यातील यशोदा या सिड्स कंपनीने शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली होती. उपवन क्षमता नसलेले बियाणे बाजारात विकून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केल्याप्रकरणी त्या कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. ही बाब जिल्ह्यात घडली असतानाच या सहा कृषी केंद्र धारकांनी केलेल्या काळेबेर प्रकरण उघडकीस आले आहे.
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये याकरिता जिल्हा परिषद कृषी विभागाने भरारी पथकाची नेमणूक केली आहे. यात एक पूर्ण वेळ व २३ अर्धवेळ गुणवत्तानियंत्रण निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर देखरेख ठेवतात. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी जिल्ह्यातील कृषी केंद्रांची नियुक्ती केली असता त्यात उपवन केंद्राची परवान्यात नोंद न घेता परस्पर साठा विक्री करणे, बिल बुकामध्ये तफावत असणे, बिल बुक साठा नोंदी व दुय्यम या तिन्हीची बेरीज न जुळणे, विक्री अहवाल सादर न करणे, विक्री अहवाल आॅनलाईनवर न टाकणे, चांगल्या ब्रांडखाली नकली निविष्टा विक्री करणे, विक्री बिल शेतकऱ्यांना न देणे व सही न घेणे, दस्तावेज बरोबर न ठेवणे आदी त्रृट्या आढळून आल्यामुळे भंडारा व लाखांदूर तालुक्यातील या सहा कृषी साहित्य विक्रेत्यांवर बंदी घातली. बियाणे नियंत्रण आदेश १९८३, बि बियाणे अधिनियम १९६८ व बियाणे अधिनियम १९६६ च्या कलमान्वये कारवाई करून कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत.

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने भरारी पथकाने तपासणी दरम्यान अनियमितता आढळली. कृषी केंद्र संचालकांनी फसवणूक न करता त्यांना मार्गदर्शन करून चांगल्या प्रतीचे बि बियाणे विक्री करावी, शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याची बाब निदर्शनास येताच कृषीविभागाकडे तक्रार दाखल करावी.
- एस.एस. किरवे,
कृषी विकास अधिकारी, जि.प.भंडारा

Web Title: Sales Offices Order for six Agricultural Centers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.