माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांना श्रध्दांजली
By admin | Published: September 13, 2015 12:31 AM2015-09-13T00:31:59+5:302015-09-13T00:31:59+5:30
जिल्हा परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात माजी आमदार सेवक वाघाये यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
भंडारा : जिल्हा परिषदेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात माजी आमदार सेवक वाघाये यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्याचे माजी खासदार बाळकृष्ण वासनिक यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, बांधकाम सभापती विनायक बुरडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी वाघाये यांनी स्व. बाळकृष्ण वासनिक, माजी खासदार मुकुल वासनिक यांचे वडील असून त्यांनी वयाच्या ३५ व्या वर्षी सन १९५७ ते १९६२ दरम्यान भंडाराचे खासदार होते. काँंग्रस निवडणुकीच्या प्रचार कार्यासाठी त्यानी बैलगाडीतून गावखेडे पिंजून काढले होते. ते स्वातत्र संग्राम सैनिक होते. व वयाच्या ८७ व्या वर्षी यांचे निधन झाले. त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो अशी सामूहिक श्रध्दांजली सभागृहात वाहण्यात आली.
याप्रसंगी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, प्रेमसागर गणविर, सचीन घनमारे, स्वाती बोंबले, प्यारेलाल वाघमारे, प्रेमदास वनवे, नीलकंठ कायते, उत्तम कळपाते, रामराव कारेमारे, भाऊराव गिलोरकर, विजय दुबे, मोनाली गाढवे, प्रशांत सरोजकर, रामकृष्ण वाढई, मंगला बगमारे, मोनाली गाढवे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)