शहापूरच्या राजकारणात समता पॅनलने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 11:58 PM2017-10-24T23:58:28+5:302017-10-24T23:58:38+5:30

तालुक्यातील महत्त्वाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक केंद्रबिंदू असलेल्या स्थानिक शहापूर ग्रामपंचायतवर दर्शनपाल मलहोत्रा, सुरेश गजभिये, भिमराव भुरे व जगदिश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ....

 Samata panel wins in Shahapur politics | शहापूरच्या राजकारणात समता पॅनलने मारली बाजी

शहापूरच्या राजकारणात समता पॅनलने मारली बाजी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शहापूर : तालुक्यातील महत्त्वाचे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व आर्थिक केंद्रबिंदू असलेल्या स्थानिक शहापूर ग्रामपंचायतवर दर्शनपाल मलहोत्रा, सुरेश गजभिये, भिमराव भुरे व जगदिश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली समता पॅनलने एकतर्फी विजय प्राप्त केला असून सरपंच पदी मोरेश्वर अंताराम गजभिये निर्वाचित झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी युवा जनशक्तीचे संदिप मनोहर ढोके यांचा ४१५ मतांनी पराभव केला. सरपंच पदाच्या निवडणुकीत मोरेश्वर अंताराम गजभिये याना १०७६, संदिप मनोहर ढोके याना ६६१, रणजित रामराव मेश्राम यांना ४५२ मते प्राप्त झाली.
ग्रामपंचायत सदस्य पदाकरिता झालेल्या निवडणूकीत ११ पैकी ९ जागावर समता पॅनलने विजय प्राप्त करुन आपले वर्चस्व सिध्द केले. युवा जनशक्ती व परिवर्तन पॅनला प्रत्येकी एक जागेवर समाधान मानावे लागले.
स्थानिक ग्रामपंचायतवर समता पॅनलचा सलग ७ वा विजय आहे. थेट जनतेतून पहिल्यांदाच झालेली निवडणूक सुरुवातीला चुरशीची होणार असे असतानाच मतदानापर्यंत मतदाराचा कौल बदलत गेला.
नवनिर्वाचित सरपंच मोरेश्वर गजभिये हे शहापूर येथील ऐतिहासिक भीम मेळाव्याचे संयोजक आहेत. निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यामधे किरण राजाभोज भुरे, अल्का लेहनदास पाटील, तेजेंद्र गणपतराव अमृतकर, छाया दिलीप घरडे, अनमोल चंद्रभान गजभिये, शालू भगवान भुरे, केशव भोजराम तिरबुडे, राजेश बळीराम डोरले, रिना योगेश गजभिये, नितेश गजभिये व सीमा राजेश खोब्रागडे यांचा समावेश आहे.
समता पॅनलच्या विजयाकरिता पांडुरंग बेलेकर, दुर्योधन खोब्रागडे, भिमराव रामटेके, प्रकाशबाबू गजभिये, हेमराज भुरे, सुरेश रणदिवे, विनायक तुरस्कर, नरेंद्र ढोमणे, चंद्रभान कारेमोरे, मुकुंदा सेलोकर, महेश भुरे, गणपत भुरे, भगवानदास कारेमोरे, श्रावण भोंदे, नरेश लांजेवार, श्याम सेलोकर, भगवान भोंदे, भैय्यालाल थोटे, राकेश गजभिये, दिपक सलूजा, डॉ. अमृत नारनवरे, तुकाराम भुरे, हिरालाल कारेमोरे, वाहाने, यादोराव खोब्रागडे, बालू दुरूगकर, नितीन वैद्य, मिलिंद खोब्रागडे, परसराम डोईजडे, सुभाष डोरले, श्रावण कारेमोरे, नरेंद्र खोब्रागडे, गुलाब सेलोकर, दिलीप देवगडे, नाना भुरे, रामचंद्र बागडे, हरिकिशन भुरे, विलास घरत, पंकज गजभिये, सुरेश मेश्राम, दामोधर बन्सोड, सुधीर मेश्राम, अशोक मेश्राम, ऋषभ गजभिये, युवराज फुले, धनराज बांगर, के.च. पाटील, मनोहर गजभिये, अतुल गजभिये, श्रावण भुरे, उल्हास भुरे, क्रिष्णा भोंदे, मोरेश्वर वैद्य, सिध्दार्थ खोब्रागडे, रवी लेंडे, पुरुषोत्तम जगनाडे, ओमप्रकाश चिचखेडे, जितेंद्र बोरकर, हितेश पंचभाई, आशिर्वाद रामटेके आदींनी सहकार्य केले.

Web Title:  Samata panel wins in Shahapur politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.