देवरी क्षेत्रातील २० कोटींच्या विकास कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:34 AM2021-03-21T04:34:56+5:302021-03-21T04:34:56+5:30

अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या कामांमध्ये सालेकसा तालुक्यातील आमगाव, लोहारा, फुक्कीमेटा, तिरखेडी, पुराडा ते सिरपूर या मार्गावर नवीन पूल बांधकामाकरिता ९० ...

Sanction for development works worth Rs. 20 crore in Deori area | देवरी क्षेत्रातील २० कोटींच्या विकास कामांना मंजुरी

देवरी क्षेत्रातील २० कोटींच्या विकास कामांना मंजुरी

Next

अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या कामांमध्ये सालेकसा तालुक्यातील आमगाव, लोहारा, फुक्कीमेटा, तिरखेडी, पुराडा ते सिरपूर या मार्गावर नवीन पूल बांधकामाकरिता ९० लाख रुपयांचे निधी तर देवरी तालुक्यातील मरामजोब-मासुलकसा- सिंगनडोह-पालांदूर/जमी- मगरडोह- घोगरा व केशोरी या मार्गावर नवीन पूल बांधकामाकरिता १ कोटी ५० लाख, भर्रेगाव- राजमडोंगरी- परसोडी व ककोडी या मार्गावर लहान पूल बांधकामाकरिता १ कोटी ५० लाख, भर्रेगाव- राजमडोंगरी-परसोडी व ककोडी या मार्गावर नवीन पूल बांधकामाकरिता १ कोटी ५० लाख तर सालेकसा तालुक्यातील आमगाव (खुर्द) तिरखेडी-पुराडा व फुक्कीमेटा या मार्गावर रोड रुंदीकरण आणि डांबरीकरणाकरिता ५ कोटी रुपये, देवरी तालुक्यातील कोटजंभुरा-लटोरी-नवेगाव- सोनपुरी- लाभानधारणी व लोहारा या मार्गावरील रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण या कामाकरिता ४ कोटी रुपये, सालेकसा तालुक्यातील विचारपूर-गोर्रे- तिरखेडी या मार्गावरील रोड रुंदीकरण व डांबरीकरणाकरिता ५० लाख रुपये, अड्याळ-दिघोरी- नवेगाव ते चिचगड या मार्गावरील रोड डांबरीकरणाकरिता ३० लाख रुपये, काटोल- सावनेर-आमगाव-सालेकसा ते राज्य सीमेपर्यंतच्या मार्गावर रोड डांबरीकरणाकरिता २ कोटी रुपये, त्याचप्रमाणे, काटोल-सावनेर-आमगाव- सालेकसा ते राज्य सीमेपर्यंतच्या मार्गावर डांबरीकरण करण्याकरिता २ कोटी ४० लाख रुपयांचा निधी अशा प्रकारे तिन्ही तालुक्यांतील विविध विकासकामांकरिता एकूण २० कोटी रुपयांचा निधी मंजूर कण्यात आला आहे. या विकासकामांना मंजुरी मिळवून देण्याकरिता आ. कोरोटे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला.

Web Title: Sanction for development works worth Rs. 20 crore in Deori area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.