देव्हाडा-ढोरवाडा रेती घाटावर रेती तस्करांचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:11 PM2018-12-04T22:11:44+5:302018-12-04T22:12:00+5:30
तुमसर व मोहाडी तालुक्यातील सीमावर्ती देव्हाडा तथा ढोरवाडा वैनगंगा नदी घाटातून सर्रास रेतीचे उत्खनन गत सहा महिन्यापासून सुरु आहे. रेती तस्करांनो आता तरी थांबा अशी वेळ आली आहे. महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे. हा मुख्य व तितकाच संवेदनशिल प्रश्न परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. कारवाई न होण्यामागील कारण जिल्हाधिकाऱ्यांनी शोधण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर व मोहाडी तालुक्यातील सीमावर्ती देव्हाडा तथा ढोरवाडा वैनगंगा नदी घाटातून सर्रास रेतीचे उत्खनन गत सहा महिन्यापासून सुरु आहे. रेती तस्करांनो आता तरी थांबा अशी वेळ आली आहे. महसूल प्रशासन मूग गिळून गप्प आहे. हा मुख्य व तितकाच संवेदनशिल प्रश्न परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. कारवाई न होण्यामागील कारण जिल्हाधिकाऱ्यांनी शोधण्याची गरज आहे.
देव्हाडा व ढोरवाडा येथे वैनगंगा नदीचे विस्तीर्ण पात्र आहे. देव्हाडा नदी घाट मोहाडी तालुक्यात येते तर ढोरवाडा नदीघाट तुमसर तालुक्याच्या सीमेत आहे. देव्हाडा येथील नदी पात्रातील रेती उत्खनन करणारे ट्रॅक्टर तुमसर-गोंदिया राज्य मार्गावरून सहज दिसतात. दोन्ही नदी घाटातून सर्रास रेतीचे उत्खनन सुरु आहे. नदी घाटांचे येथे लिलाव नाही हे विशेष. रेती उत्खनन केल्यानंतर ट्रॅक्टरमध्ये भरून साठ्यावर ठेवली जाते. तिथून ती ट्रकमध्ये भरली जाते. काही ट्रॅक्टर स्थानिक रेतीचा व्यवसाय करतात. टप्प्याटप्प्यांवर रेती तस्करांचे खबरे आहेत. परंतु दोन्ही घाट येथे रेती तस्करांकरिता मोकाट सोडल्याचे दिसून येते. अद्यापपर्यंत महसूल प्रशासनाने येथे कोणतीच कारवाई केली नाही हे विशेष. कारवाई न करण्यामागे येथे गुढ कायम आहे, असा सवाल विचारला जात आहे.
देव्हाडा व माडगी येथे स्वतंत्र तलाठी कार्यालय आहे. महसूल प्रशासनाचा शेवटचा घटक तलाठी आहे. दोन्ही गावे नदी किनाºयावर आहेत. परंतु त्यांनाही रेती उत्खनन करताना कुणी दिसत नाही. हा संशोधनाचा विषय आहे. रेती उत्खनन करणाºयांची येथे टोळी सक्रीय आहे. या टोळीला कुणाचे आशीर्वाद आहे हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. कारवाई न होण्यामागे कारण निश्चित आहे. कारणांचा शोध केवळ येथे जिल्हाधिकारीच घेऊ शकतात. तलाठ्यांना येथे रेती उत्खनन दिसत नाही.
रेल्वे पुल व माडगी मंदिर परिसरापासून ६० ते ७० मिटर अंतरावर रेतीचे उत्खनन सुरु आहे. सध्या नदी पात्रात रेती साठा नाही. जी आहे तिचे उत्खनन सुरु आहे. रेल्वे पुलाला येथे धोक्याची शक्यता आहे. ढोरवाडा हे गाव मुख्य रस्त्यापासून चार कि.मी. अंतरावर आहे. त्यामुळे रेती तस्करांचा धुमाकुळ ढोरवाडा गावाकडे अधिक आहे. नदी पात्रातील रेती सुरक्षित नाही. रेतीचा व्यवसाय हा नगदीचा व्यवसाय झाल्याने प्रतिष्ठीतांनी आपला मोर्चा या व्यवसायाकडे वळविला आहे.
प्रशासनाकडे सक्षम यंत्रणा निश्चित आहे. परंतु मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार असा विचार महसूल प्रशासन निश्चितच करीत असल्याची माहिती आहे. जिल्हाधिकारी शांतनू गोयल सक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांनी रेती तस्करांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे. पर्यावरण ºहासाची जबाबदारी कुणीच घेत नाही. परंतु पर्यावरण जागरुकता व ज्ञानाचे डोज पाजणारे येथे मूग गिळून गप्प आहेत.