रस्त्याच्या कडेला रेतीचे ढिगारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 09:52 PM2018-09-28T21:52:13+5:302018-09-28T21:52:31+5:30
जवळच्या ईंदुरखा गावाला रोहणा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इंदुरखा येथील रेती तस्करांनी अवैध रेती जमा केली असून रात्रीला दहा चाकी टीप्पर द्वारे नागपूर, मौदा येथे विक्री केल्या जात आहे. याकडे भंडारा तहसीलदाराचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : जवळच्या ईंदुरखा गावाला रोहणा मार्गे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात इंदुरखा येथील रेती तस्करांनी अवैध रेती जमा केली असून रात्रीला दहा चाकी टीप्पर द्वारे नागपूर, मौदा येथे विक्री केल्या जात आहे. याकडे भंडारा तहसीलदाराचे पुर्णत: दुर्लक्ष आहे.
स्थानिक गावातील पुढाºयांना मलाई खायला मिळत असल्याने तेही डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत. राखी पौर्णिमेच्या वेळेस सुरनदीला पूर आल्याने मोठ्या प्रमाणात शुभ्र वाळू वाहत आली याचाच फायदा घेत इंदुरखा येथील वाळु तस्करांनी ट्रॅक्टरद्वारे वाळु काढून रोहणा - इंदुरखा रस्त्याच्या कडेला जमा करुन विक्रीचा गोरखधंदा सुरु केला आहे.
दिवसभर १० ते १५ ट्रॅक्टरद्वारे सुरनदीमधील बारिक वाळु काढून रस्त्याच्या कडेला जमा केली जाते. यावेळी वाळू तस्करांचे मजूर तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, एस.डीओ महसुल यांचे कार्यालय व मुख्य रस्त्यावर बसले असतात. दिवसभर व रात्री १० वाजतापर्यंत रेती जमा झाल्यानंतर पहाटे ४ वाजता ट्रकांना बोलावून प्रती ट्रक ५ हजार रुपये प्रमाणे वाळू विकल्या जात आहे.
र्इंदुरखा गावातीलच एका तरुणाची जेसीबीअसून तो प्रती ट्रक भरण्यासाठी १ हजार रुपये घेतो. वाळू भरलेले ट्रक रेल्वे पुल व र्इंदुरखा- कोथुर्णा मार्गावर रेल्वे चौकी असल्याने रोहणा मार्गे दहेगाव वरुन नागपूरला पाठविल्या जात आहे. रेती तस्करांना मुख्य रस्त्यापर्यंत ट्रक पोहचवायचे राहत असल्याने रोहणा व दहेगाव येथे दोन रेती तस्कर रात्रभर जागत असतात. यात प्रती ट्रक पाच हजार रुपये वाळू तस्करांना मिळत असल्याने ते गब्बर झाले असून रांत्रदिवस मद्य प्राशन करुन असतात.
एखाद्या व्यक्तीने वाळू चोरीबद्दल त्याला हटकले तर शिवीगाळ करुन मारायला धावतात. मध्यप्रदेशातील रॉयल्टी खापा येथून खरेदी करुन ट्रक मालक र्इंदुरखा येथुन वाळु भरुन नागपूरला १८ हजार रुपये मध्ये विकत आहेत. भंडारा ते नागपुरपर्यंत एखादा अधिकाºयाने ट्रक पकडल्यास ट्रक ड्रायव्हर मध्यप्रदेश मधून वाळू खरेदी केल्याचे सांगून रॉयल्टी दाखवितात व त्या अधिकाºयांची दिशाभुल करीत असल्याचेही सांगतात.