मांडवी ते खमारी रस्त्यावर रेतीचे साठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2018 10:01 PM2018-08-03T22:01:41+5:302018-08-03T22:02:25+5:30
जिल्ह्यात रेती तस्करीने उन्माद घडविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रोहा येथील घटनेतून दिसून आला. मात्र, तरीही रेती माफियांचे धाडस कमी झालेले दिसत नाही. माफीयांनी बक्कळ पैसे कमविण्यासाठी अवैध रेतीची डंम्पींग माडवी ते खमारी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला करुन ठेवली जात आहे. दोन दिवसात लाखोंची रेती रस्त्याच्याकडेला डम्पींग झालेली असतांना प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : जिल्ह्यात रेती तस्करीने उन्माद घडविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रोहा येथील घटनेतून दिसून आला. मात्र, तरीही रेती माफियांचे धाडस कमी झालेले दिसत नाही. माफीयांनी बक्कळ पैसे कमविण्यासाठी अवैध रेतीची डंम्पींग माडवी ते खमारी दरम्यानच्या रस्त्याच्या कडेला करुन ठेवली जात आहे. दोन दिवसात लाखोंची रेती रस्त्याच्याकडेला डम्पींग झालेली असतांना प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली दिसत नाही.
भिलेवाडा ते खडकी जिल्हा मार्गावर अज्ञात रेती तस्करांनी लाखोंचा रेती साठा अवैधपणे ट्रॅक्टरच्या सहाय्याने वैनगंगा नदीतून उपसा करुन ठेवला. आहे. पावसाळ्याच्या दिवसात होणारा रेतीचा तुटवडा व मोठी लक्षात घेता दुप्पट पैसा कमवून लखपती होण्यासाठी माफियांनी हा मार्ग पत्करला आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने येथे रेतीचा साठा केला जात आहे. तसेच रात्रीच्या दरम्यानच साठविलेल्या रेतीची विल्हेवाट लावली जाणार आहे.
सदर रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भंडारा यांच्या कार्यक्षेत्रात मोडतो तर कारधा ग्रामीण पोलीस व तहसील कार्यालय भंडारा यांच्या अधिकार क्षेत्रातही येतो. परंतू एकाही विभागाकडून या प्रकरणी कार्यवाही होतांना दिसत नाही. या साठ्यांमुळे रस्त्यावरील वाहतूकीला मात्र, मोठा फटका बसत आहे.