सेनेची भाजपावर कुरघोडी!

By admin | Published: September 13, 2015 12:33 AM2015-09-13T00:33:07+5:302015-09-13T00:33:07+5:30

राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना ...

Sanechi BJP kurghodi! | सेनेची भाजपावर कुरघोडी!

सेनेची भाजपावर कुरघोडी!

Next

भाजपचा आक्षेप : संजय गांधी निराधार समिती जाहीर
भंडारा : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री असलेले भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती सात सप्टेंबर रोजी नियुक्त केली. तालुकानिहाय सात सदस्यीय समितीत शिवसेनेने भाजपावर कुरघोडी केली आहे. या समितीतील नियुक्त सदस्यांची नावे बाहेर येताच भाजपने आक्षेप नोंदविला आहे. आता ही समिती रद्द होते की ती यादीच कायम राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भंडारा जिल्ह्यातील पवनी आणि भंडारा तालुक्याची संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती नियुक्त करणारे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातून पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले. त्यानंतर हे पत्र भाजप कार्यकर्त्यांच्या हातात पडताच नाराजी सूर उमटला आहे. हे पत्रच सोशल मिडीयाच्या ‘वॉटसअप’वर टाकण्यात आले. जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असताना शिवसेनेची चलती कशी? सेनेचा एकही आमदार नसताना भाजपचे लोकप्रतिनिधी काय करतात? आम्ही आयुष्यभर चटयाच उचलायच्या का? असे संदेश फिरु लागले. त्यानंतर त्याची दखल घेत खासदार नाना पटोले यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून यादीवर आक्षेप नोंदविला आहे.
पवनी तालुक्यात सात सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी सेनेचे विजय काटेखाये तर सदस्यांमध्ये सेनेचे नरेश बावनकर, प्रमोद मेंढे, बाळकृष्ण फुलबांधे, तुलशी वंजारी तर भाजपचे डॉ.संदीप खंगार व कुंदा तलमले यांचा समावेश आहे. भंडारा तालुक्यात समितीच्या अध्यक्षपदी सेनेचे अनिल गायधने तर सदस्यांमध्ये सेनेचे अरुण भेदे, प्रकाश पारधी, नीता चोपकर, वष्णु दहीवले तर भाजपचे विनोद बांते व प्रशांत खोब्रागडे यांचा समावेश आहे. युतीचे सरकार असल्यामुळे अशासकीय समितीत समान वाटा असावा, असला तर कार्यकर्त्यांचा सन्मान होईल, असे वाटत होते. परंतु भाजपला डावलल्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांचा स्वपक्षातीलच लोकप्रतिनिधींवर प्रश्नांचा भडीमार करीत आहेत. त्यांना उत्तरे देताना लोकप्रतिनिधींची दमछाक होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Sanechi BJP kurghodi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.