धान केंद्रावर स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:36 AM2021-02-24T04:36:29+5:302021-02-24T04:36:29+5:30
साकाेली : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्रगती काॅलनी पहाडीच्या धान केंद्रावर आज स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पत्रकार ...
साकाेली : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त प्रगती काॅलनी पहाडीच्या धान केंद्रावर आज स्वच्छता अभियान हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी, डाॅ. प्रा. जितेंद्रसिंह ठाकूर, साई ज्वेलर्सचे जनार्धन गजापुरे, उमेश कापगते, हेमकृष्ण वाडीभस्मे आदींच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान कार्यक्रम संपन्न झाला.
सामाजिक कार्यकर्ते डी.जी. रंगारी यांनी सांगितले की, अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा यानी बुरसटलेल्या समाजाचा विकास करण्याचे व्रत हाती घेऊन कीर्तनासारखे प्रभावी माध्यम वापरून समाज सुधारणेचे कार्य करणारे संत गाडगेबाबा यांच्या विचाराची समाजाला आजही गरज आहे, असे मत व्यक्त केले. तर डाॅ. जितेंद्रसिंह ठाकूर यांनी सांगितले की, भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत, बेकारांना राेजगार, पशु, पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न, दु:खी व निराशांना हिंमत असा दशसूत्री संदेश संत गाडगेबाबांनी दिला, असे मत डाॅ. ठाकूर यांनी व्यक्त केले.
प्रगती काॅलनी पहाडी ध्यान केंद्रावर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जनार्धन गजापुरे तर आभार उमेश कापगते यांनी मानले.