सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे संस्कार शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:52 PM2018-05-04T22:52:34+5:302018-05-04T22:52:34+5:30

सृष्टीतील चलअचल घटकांकडून सकारात्मक ऊर्जा घेण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, त्यांच्यात समाजभान आणणे, संवेदनशीलता जागवणे ही काळाची गरज असून, या संस्कारच्या शिबिरात ती क्षमता आहे, हे मी याच शिबिरात २०-२५ वर्षापूर्वी घेतलेल्या अनुभवाने निश्चितपणे सांगू शकतो.

Sanskar Camp providing positive energy | सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे संस्कार शिबिर

सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारे संस्कार शिबिर

googlenewsNext
ठळक मुद्देजय कुळकर्णी : ग्रीष्मकालीन नि:शुल्क संस्कार शिबिराचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सृष्टीतील चलअचल घटकांकडून सकारात्मक ऊर्जा घेण्यास विद्यार्थ्यांना प्रेरित करणे, त्यांच्यात समाजभान आणणे, संवेदनशीलता जागवणे ही काळाची गरज असून, या संस्कारच्या शिबिरात ती क्षमता आहे, हे मी याच शिबिरात २०-२५ वर्षापूर्वी घेतलेल्या अनुभवाने निश्चितपणे सांगू शकतो. मला खुप आनंदीत व संस्कारीत करण्याचे काम, मागील २७ वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या संस्कार शिबिराने केल ेआहे, असे भावूक उद्गार ग्रीष्मकालीन नि:शुल्क संस्कार शिबिराचे उद्घाटन करतांना डॉ. जय आरामचंद्र कुळकर्णी यांनी काढले.
याप्रसंगी अनुभवलेल्या अनेक प्रसंगाचे चित्र शिबिरार्थ्यांसमोर उभे करीत, नि:शुल्क परंतु अतिशय मोलाचे हे शिबिर सकारात्मक उर्जा प्रदान करणारे, आगळे शिबिर ठरेल असे डॉ. जय कुळकर्णी म्हणाले, कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व साने गुरुजींचा वारसा चालविणाºया समाजसेवी व विद्यार्थी प्रिय शिक्षीका स्मिता गालफाडे यांनी सकारात्मक ऊर्जेची पॉझीटिव्ह एनर्जी संकल्पना स्पष्ट केली. त्यांनी शिबिराला वेळोवेळी भेट देत शिबिर हसरे, बोलते, नाचते, खेळते, करण्याचा प्रयत्न करेन असे आश्वासन याप्रसंगी दिले. बहरायाचे वय हे आमुचे उमलायाचे दिवस असे हा संस्कार गीताचा धागा पकडत प्रमुख अतिथी डॉ. तृप्ती जय कुळकर्णी यांनी, या वयातील मैत्रीभावनेचे महत्व विशद केले. त्यांच्या हस्ते गांधी जीवन व विचार २ आॅक्टोंबर २०१७ च्या परिक्षेत, राज्य व जिल्हास्तरावर प्रथम येणाºया विद्यार्थ्यांना बक्षीस प्रदान करण्यात आलीत.
संस्कार शिबिराचे प्रा. नरेश आंबिलकर यांनी शिबिरार्थ्यांशी संवाद साधत उपस्थित शंभराच्यावर शिबिरार्थ्यांना खळखळून हसविले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्या मंदा चोले यांनी अनेक प्रेरक गोष्टींचा दाखल देत शुभेच्छा व्यक्त केल्या. पालक म्हणून उपस्थित प्रमोद पनके म्हणाले मी देखील बालक बनून शिबिराचा लाभ घेणार. कार्यक्रमाचे संचालन शिबिर सहप्रमुख सागर भुरे व आशिष भोंगाडे यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय सानिया सरटकर हिने करुन दिला. आभार महेश रणदिवे यांनी मानले. याप्रसंगी मंचावर शिबिर आयोजक प्रा. वामन तुरिले, जगदीश जांगळे, पतंजली योग समितीच्या योगाचार्य गीता इलमे होत्या. प्रमुख उपस्थितात अ‍ॅड. वसुधा मेघरे, वनिता पंचभैये, प्रा. डॉ. वंदना मोटघरे, डॉ. शुभा कुळकर्णी, डॉ. विजय आयलवार, प्रा. प्रेमराज मोहोकार, हर्षल मेश्राम, ज्ञानेश्वर बोडखे, सुनीता जांगळे उपस्थित होते.

Web Title: Sanskar Camp providing positive energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.