साकोली वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेत संस्कृत महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:43 AM2021-09-09T04:43:08+5:302021-09-09T04:43:08+5:30

अध्यक्षस्थानी पंडित राजकुमार दुबे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य घनशाम निखाडे, प्राचार्य पुष्पराज झोडे, आयोजक डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर व ...

Sanskrit Festival at Sakoli Wainganga Multipurpose Institution | साकोली वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेत संस्कृत महोत्सव

साकोली वैनगंगा बहुउद्देशीय संस्थेत संस्कृत महोत्सव

Next

अध्यक्षस्थानी पंडित राजकुमार दुबे होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य घनशाम निखाडे, प्राचार्य पुष्पराज झोडे, आयोजक डॉ. जितेंद्रकुमार ठाकूर व प्राचार्य डॉ. सुनीलकुमार चतुर्वेदी उपस्थित होते.

यावेळी राजकुमार दुबे म्हणाले, संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे. त्याचबरोबर आपल्याला संस्कृत भाषेला जपायला पाहिजे. सोबतच आपल्या रोजच्या दैनंदिन भाषेसोबतच संस्कृत भाषेचा वापर करायला पाहिजे. जास्तीत जास्त भाषेची ओळख असल्यास आपला विकास होतो. डॉ. जितेंद्र ठाकूर यांनी संस्कृत सर्वात प्राचीन भाषा आहे. ही सर्वांना अवगत करायला पाहिजे असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमप्रसंगी कार्यकारी प्राचार्य डॉ. अनिल गायकवाड, डॉ. संजय पाखमोडे, डॉ. रमेश अग्रवाल, डॉ. राजकुमार भगत डाॅ. पल्लवी देशमुख, प्रा. दिवाकर कामडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक डॉ. सुनीलकुमार चतुर्वेदी यांनी केले. संचालन प्राध्यापक देवेंद्र इसापुरे यांनी तर आभार प्रदर्शन पुखराज लांजेवार यांनी केले. कार्यक्रमाच्यासाठी अशोक मीना, साहिद सय्यद आदींचे सहकार्य लाभले.

Web Title: Sanskrit Festival at Sakoli Wainganga Multipurpose Institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.