सरांडीवासीयांचे घरकूल लाभासाठी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:42 AM2021-09-14T04:42:05+5:302021-09-14T04:42:05+5:30

लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील आबादी प्लाॅटवर १९७४ मध्ये जवळपास ४९ गावकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. आज स्थितीत त्यांचे त्याच ठिकाणी ...

Sarandivasis go on hunger strike for household benefits | सरांडीवासीयांचे घरकूल लाभासाठी उपोषण

सरांडीवासीयांचे घरकूल लाभासाठी उपोषण

Next

लाखांदूर तालुक्यातील सरांडी येथील आबादी प्लाॅटवर १९७४ मध्ये जवळपास ४९ गावकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. आज स्थितीत त्यांचे त्याच ठिकाणी वास्तव आहे. या लाभार्थ्यांची नावे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेत समाविष्ट असून, घरकुलासाठी पात्र ठरले आहेत. मात्र ग्रामपंचायतीच्या नमुना आठ दस्तावर लाभार्थ्यांच्या नावासमोर सरकार असा शेरा असल्यामुळे लाभार्थ्यांना घरकूल लाभापासून वंचित रहावे लागत आहे. त्यासाठी पीडित लाभार्थ्यांनी १८ ऑगस्ट रोजी तहसीलदार अखिलभारत मेश्राम यांच्यामार्फत जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन देत घरकूल लाभ देण्याची मागणी केली होती. दरम्यान पीडित लाभार्थ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर शासन, प्रशासनाकडून कसल्याही हालचाली होत नसल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य रवी शहारे यांच्या नेतृत्वात सोमवारपासून लाखांदूर तहसील कार्यालयासमोर पीडित लाभार्थ्यांनी आमरण उपोषण आंदोलन सुरु केले आहे. उपोषणकर्त्यांमध्ये श्रावण शहारे, दशरथ कवासे, प्रल्हाद मिसार, काशिराम भोपे, सुनीता घोरमडे, कैलास दिवठे, श्रीराम आठवले, गोपाल मिसार, ईश्वर मेश्राम यांच्यासह अन्य महिला व पुरुषांचा समावेश आहे.

130921\img20210913164949.jpg

आमरण ऊपोषणाला बसलेले ऊपोषणकर्ते

Web Title: Sarandivasis go on hunger strike for household benefits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.