संस्थानांच्या विलिनीकरणासाठी सरदार पटेलांनीच कणखर भूमिका घेतली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:38 AM2021-09-25T04:38:36+5:302021-09-25T04:38:36+5:30
भंडारा शहरातील लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय इतिहासाची बलस्थाने, या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते ...
भंडारा शहरातील लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय इतिहासाची बलस्थाने, या विषयावर आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर.एस. बारई, पर्यवेक्षक डी. पी. राठी, शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. फडके यांनी भारतीय इतिहासाची बलस्थाने या विषयावर मार्गदर्शन करताना गांधी युगातील सत्याग्रहाच्या मार्गाने झालेल्या सर्व सशस्त्र क्रांतिकारी चळवळी आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्यप्राप्ती कशी झाल्याचे सांगितले. फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतींची मुक्ती अशा घटनांची समग्र माहिती दिली. प्रत्येक समाजसुधारकांचे, क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य लढ्यातील प्रत्येकाचे योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण होते, असेही सांगितले. यावेळी मुख्याध्यापक आर. एस. बारई यांनी भारत माझा देश आहे आणि या देशाकरिता राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती, राष्ट्राभिमान या भावना विद्यार्थ्यांमध्ये शालेय वयातच रुजविणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यासाठी प्रत्येक शिक्षकाचे योगदानही आजच्या काळात अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. संचालन तरोणे यांनी केले तर आभार दोनोडे यांनी मानले.