सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व परिचर दोषी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:15+5:302021-08-01T04:33:15+5:30

२०२० - २०२१ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील मांढळ येथील अंजना गोविंदा नंदनवार यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते. ...

Sarpanch, Gramsevak, Rozgar Sevak and Parichar are guilty | सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व परिचर दोषी

सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व परिचर दोषी

Next

२०२० - २०२१ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यातील मांढळ येथील अंजना गोविंदा नंदनवार यांना घरकूल मंजूर करण्यात आले होते. या मंजुरी अंतर्गत शासनाद्वारे २० हजार रुपयांची अग्रिम राशी व मग्रारोहयो अंतर्गत ६ हजार ६०० रुपयांची राशी, असे एकूण मिळून २६ हजार ६०० रुपयांची राशी घराच्या पायव्याचे बांधकाम करण्यासाठी लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. ही राशी घरकूल लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात जमा करूनही संबंधित महिला लाभार्थ्याने घरकूल बांधकामाला सुरुवात केली नाही. लाभार्थी महिलेचा मुलगा स्थानिक ग्रामपंचायत येथे परिचर असल्याने येथील सरपंच व ग्रामसेवक यासोबत संगनमत करून दुसऱ्या हप्त्याचे ४५ हजार रुपयांची राशी उचल केली. या प्रकरणात लाभार्थी महिलेला घरकुलाचे बांधकाम न करताच जवळपास ७० हजार रुपयांची राशी उपलब्ध करण्यात आली होती.

याप्रकरणी स्थानिक नागरिकांनी बीडीओ व जिल्हा परिषद प्रशासनाला तक्रार करून चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार तीन सदस्यीय समितीद्वारे या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत मांढळ येथील सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक व परिचर आदींवर कर्तव्य बजावण्यात हयगय केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

बॉक्स

रोजगार सेवक ठरला बळीचा बकरा

घरकुलाचे बांधकाम न करताच निधीची उचल प्रकरणी शासकीय नियमानुसार रोजगार सेवकांची मग्रारोहयो अंतर्गत पहिल्या हप्त्याची ६ हजार ६०० रुपयांची राशी संबंधित लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली होती. तथापि घरकुलाचे बांधकाम सुरू न करण्यात आल्याने मग्रारोहयो अंतर्गत दुसऱ्या हप्त्याची राशी देण्यात आली नाही. या प्रकरणात केवळ सरपंच व ग्रामसेवकांना प्रशासकीय कारवाईपासून बचावासाठी रोजगार सेवकाला हेतूपुरस्पर या प्रकरणात फसवून बळीचा बकरा बनविण्यात आल्याची चर्चा आहे.

Web Title: Sarpanch, Gramsevak, Rozgar Sevak and Parichar are guilty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.