‘शिक्षण माझा वसा’ने सतीश चिंधालोरे सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 10:17 PM2019-01-31T22:17:58+5:302019-01-31T22:18:16+5:30

जिल्ह्यातील खराशी या छोटाश्या गावातील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक स्कुलचे शिक्षक सतीश चिंधालोरे यांना २०१८-१९ चा ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे २७ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूषण गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

Satish Chindhalore honored by 'teaching my fat' | ‘शिक्षण माझा वसा’ने सतीश चिंधालोरे सन्मानित

‘शिक्षण माझा वसा’ने सतीश चिंधालोरे सन्मानित

googlenewsNext
ठळक मुद्देगणित या विषयासाठी निवड : जिल्ह्याला प्रथम मिळाला मान

लोकमत न्यूज नेटवर्क
दिघोरी (मोठी) : जिल्ह्यातील खराशी या छोटाश्या गावातील जिल्हा परिषद डिजीटल पब्लिक स्कुलचे शिक्षक सतीश चिंधालोरे यांना २०१८-१९ चा ‘शिक्षण माझा वसा’ या राज्यस्तरीय पुरस्काराने पुणे येथे २७ जानेवारीला आयोजित कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटीचे अध्यक्ष भूषण गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
चिंधालोरे यांनी २०१० पासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम हातात घेवून त्यावर कार्य केले. यात ‘माझा पाढा मी तयार करणार, अपूर्णांकांची साक्षरता गणित कोडे उपक्रम व संस्कार, मॅथ क्लबची निर्मीती असे एकापेक्षा एक सरस उपाय निर्माण केले. तसेच शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण व्हावी म्हणून हा उपक्रम राबविला.
या उपाययोजनांचे फलीत म्हणजे विद्यार्थी स्वत:हून सदर विषयात तरबेज झाले. गणित हा विषय चालता बोलता कसा शिकायचा व त्यामध्ये विद्यार्थ्यांची गोडी कशी निर्माण होईल.
यावर भर देण्यात आला. चिंधालोरे यांनी शिष्यवृत्ती व नवोदय परिक्षेमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर मार्गदर्शन करणे सुरु केले. त्याचा परिणामस्वरुप आतापर्यंत पंधरा विद्यार्थ्यांची नवोदयमध्ये निवड झाली असून अठरा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे.
या शिक्षणाविषयकच्या क्रांतीकारक उपाययोजनाने सतीश चिंधालोरे यांची शिक्षण माझा वसा या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
शिक्षण सेवेमध्ये उल्लेखनिय योगदान दिल्याने चॅरीटेबल फाऊंडेशन व शिक्षण विवेक यांच्याकडून शिक्षण माझा वसा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या संदर्भात सतिश चिंधालोरे म्हणाले की गणित हा जगातिल सर्वात सोपा विषय आहे. फक्त तो विद्यार्थ्यांना योग्य पध्दतीने पटवून देण्यात आला पाहिजे. पालक व शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाबाबत गोडी निर्माण करण्यात यशस्वी झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

Web Title: Satish Chindhalore honored by 'teaching my fat'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.