जिल्हा कारागृहात सत्संग, प्रवचन उत्साहात
By admin | Published: July 11, 2016 12:26 AM2016-07-11T00:26:54+5:302016-07-11T00:26:54+5:30
येथील जिल्हा कारागृहात गुरुदेव संत बलजितसिंह महाराज यांचे सत्संग प्रवचन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
बंदीचा सहभाग : मनपरिवर्तनातून गुन्हेगारीपासून बचाव
भंडारा : येथील जिल्हा कारागृहात गुरुदेव संत बलजितसिंह महाराज यांचे सत्संग प्रवचन कार्यक्रम उत्साहात पार पडला. तुरुंग अधिकारी रणदिवे व मेंगळे सुभेदार काळे व फडके यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे आयोजन विश्व मानव रुहानी केंद्र नंवानगर शाखा भंडारा द्वारा कृष्णा बावनकर, दिलीप बावनकर, संजय कुंभलकर, अरुण कुंभलकर, मारोती भेदे, प्रा.डॉ.नितीन नवखरे यांनी व इतर सेवादारांनी केले होते.
कारागृह अधीक्षक कुमरे आल्यापासून कारागृहातील शिस्त व कायदा व नियमांची अंमलबजावणी होत असते, हे दिसून येत आहे. गुरुदेव संत बलजितसिंह महाराज यांचे सत्संग प्रवचन कार्यक्रम प्रचारकाद्वारे भंडारा जिल्हा कारागृहात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात २०० ते २५० बंदीनी शिस्तीचा परिचय देत अत्यंत भक्तीभावाने सत्संगात सहभाग नोंदविला. कारागृहातील बंदींची शिस्त शाळकरी विद्यार्थ्यांना सुद्धा बोध घेण्यासारखी होती अशी शिस्त सर्व कारागृहात राहिली तर गुन्हेगारांचे मतपरिवर्तन करून गुन्हेगारीपासून त्यांना परावर्तीत करून त्यांच्या जीवनात पुढे सत्याचे मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी नक्कीच मदत होईल. कार्यक्रमासाठी कारागृह अधीक्षक कुमरे, उपनिरीक्षक मेघरे, सुभेदार साखरवाडे तसेच कारागृहातील अधिकारी व कर्मचारी यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)