सत्संगातून मानवी जीवनाला मिळते विधायक दिशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:30 AM2021-02-08T04:30:56+5:302021-02-08T04:30:56+5:30
भंडारा तालुक्यातील चिखली येथे पंचकमिटीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत पुराण सप्ताहात ते बोलत होते. चिखली येथे मागील काही वर्षांपासून भागवत ...
भंडारा तालुक्यातील चिखली येथे पंचकमिटीच्या वतीने आयोजित श्रीमद्भागवत पुराण सप्ताहात ते बोलत होते. चिखली येथे मागील काही वर्षांपासून भागवत सप्ताहाची परंपरा सुरू आहे. सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमात तसेच भागवत सप्ताहात धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी आळंदीचे हभप दिलीप महाराज यांनी दररोज कीर्तनातून प्रबोधन केले. यावेळी गावातील आध्यात्मिक वारसा लाभलेले तानाजी गायधने यांनी, भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग असून हरिनामाच्या स्मरणाने आपापसातील मतभेद दूर होऊन सर्वांनाच शांतता आणि संयमाचा संदेश दिला जातो. त्यामुळे भक्तिमार्ग हाच सर्वश्रेष्ठ आहे, असे सांगितले. यावेळी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या गुणवंतांचा तसेच गावातील चांगले उपक्रम राबवणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चिखली गावातील भक्तांसह परिसरातील खरबी, खराडी, ठाणा, निहारवाणी येथील आणि वारकरी भक्तांची उपस्थिती होती. भागवत सप्ताहासाठी वारकरी भजनी मंडळाचे अशोक गायधने, हेमराज गायधने, कोठीराम गायधने, चुडामन हटवार, देवानंद गायधने, इस्तारी शेंडे, वसंता मेहर, ताराचंद वाघमारे, खेमराज गायधने, हुसाराम मेहर, घनश्याम शहारे, दुर्योधन गायधने,विकास गंगा , बाळा मेहर, भगवान हटवार,युवराज गायधने, शिवा हटवार, नितेश मेहर, यज्ञ संचालन करणारे तानाजी गायधने,ठाकचंद मेहर,महिला मंडळाच्या शिल्पा गायधनी,मनीषा गायधने, नानीबाई कुंभलकर,राधा गंगा रे, सुंदरबाई गायधने, शारदा मोहतुरे यांच्यासह भाविकभक्त उपस्थित होते. यावेळी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गरजूंना चष्म्याचे वितरण करण्यात आले. भागवत सप्ताहासाठी खरबी दहेगाव, चिचोली, निहारवाणी, मोहदुरा येथील मंडळी उपस्थित होते.
Attachments area