भंडाऱ्यात सत्याग्रह आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 11:14 PM2018-04-21T23:14:13+5:302018-04-21T23:14:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाधिकारी चौकात एक दिवसीय उपोषण सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
सत्याग्रह आंदोलन प्रसंगी धर्माचार्य प्रमुख हभप श्याम महाराज हटवार, गहाणे महाराज तसेच कलाम शेख यांनी संबोधित केले. अयोध्या येथे भव्य राम मंदिराचे निर्माण करण्यासाठी संसदेत कायदा तयार करणे, समान नागरी कायदा लागू करणे, संपूर्ण गौहत्या बंदी कायदा संसदेत लागू करणे, शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग शिफारसी लागू करणे, बांगलादेशी व रोहिग्यांना घुसखोरी करणाऱ्यांना देशातून बाहेर काढणे, देशातील कॉन्ट्रॅक्ट लेबर सिस्टीम बंद करणे व कामगारांचे रक्षण करणे, स्वस्त व गुणवत्तायुक्त शिक्षण प्रणालीचा अवलंब करणे इत्यादी मागण्या घेऊन डॉ.प्रविण तोगडीया यांनी देशव्यापी धरणे आंदोलनाचे आवाहन केले होते.
त्या समर्थनार्थ शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणा सत्याग्रहाचे आयोजन केले होते.
यावेळी कार्यक्रमाला प्रामुख्याने भंडारा जिल्हा सचिव उपाध्यक्ष विकास मदनकर, मयूर गौतम, प्रा.देवेश नवखरे, सिनेट सदस्य प्रविण उदापुरे, जिल्हा परिषद सदस्य सुभाष आजबले, पन्ना सार्वे, आशुतोष मिश्रा, विनोद गायधने, दिपक मेंढे, मनिष बिच्छवे, विनोद थोटे, हर्षल जावळकर, पंचायत समिती सदस्य दर्शन भोंदे, विश्वजीत घरडे, राजेश मेश्राम, रोशन ठवकर, विनायक मुंगमोडे, संजय मते, शाम सालटकर, शिवसेनेचे शिवा भंडारी, शैलेश श्रीवास्तव, राकेश आंबोने, संजय पटले, प्रविण हेडाऊ किरण चवळे, बालू ठवरकर, संदीप खराबे, अमीत बारस्कर, मयूर बिसेन, विनोद राखडे, संजय मते, अतुल मानकर, प्यारेलाल ईलमे, विक्की खराबे, मनोज चावरे व मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांना या मागण्यांचे निवेदन देवून सत्याग्रह आंदोलनाची सांगता करण्यात आली.