कुंटणखान्यावर धाड, सात अटकेत
By admin | Published: February 17, 2017 12:34 AM2017-02-17T00:34:35+5:302017-02-17T00:34:35+5:30
स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बेला व विद्यानगरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर
सहा महिलांचा समावेश : बेला व विद्यानगर येथे एलसीबीची कारवाई
भंडारा : स्थानिक गुन्हे शाखेने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर बेला व विद्यानगरमध्ये सुरू असलेल्या कुंटणखान्यावर धाड घालून सहा महिलांसह एका इसमाला अटक करण्यात आली. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी केली.
पहिली कारवाई विद्यानगर परिसरात करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार धुसर यांना विद्यानगर परिसरात ३५ वर्ष वयाची महिला मुलींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याची व तसा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. शिताफिनी सापळा रचून सदर घरावर धाड घालण्यात आली. यात सदर महिलेसह तीन महिलाही आढळल्या. चौघांनाही अटक करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत बेला येथील असून येथे ४० वर्षाची महिला स्वत:च्या घरी मुलींना देहविक्री करण्यास प्रवृत्त करीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली असता एक महिला व एक इसम यांना यासंबंधाने अटक करण्यात आली. दोन्ही घटनेत अटक करण्यात आलेल्या जणांची संख्या सात आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक वनिता साहू, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुरेश धुसर, पीएसआय एस.एच. रिजवी, कमलेश सोनटक्के, प्रितीलाल रहांगडाले, नेपालचंद्र टिचकुले, राजेश गजभिये, सुधीर मडामे आदींनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)