सौंदडवासीयांनी काढला पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:13 PM2018-07-23T23:13:10+5:302018-07-23T23:13:30+5:30
सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अड्याळ : सौंदड पुनर्वसन सतरा दिवसांपूर्वी घडलेल्या मारहाणीचा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे. असा प्रकार यापूर्वीही अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत घडला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांनी या आधीही मोर्चा काढला होता. पोलीस प्रशासनाने ग्रामस्थांना आश्वासन दिले होते परंतु त्यातही ते ‘सपशेल फेल’ ठरले. कारवाई आरोपींवर करण्यापेक्षा निर्दोषांवर करण्यात आल्याने सौंदडवासियांनी अड्याळ पोलिसा ठाण्यावर शांततेत मोर्चा काढला.
अड्याळ पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी तहसिलदार गजानन कोकुर्डे यांना मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर तिक्क्स, पोलिस निरिक्षक सुरेश ढोबळे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
निवेदनात एकूण १० प्रमुख मागण्यांचा उल्लेख करण्यात आला. त्यात हल्ल्याचा खटला जलदगतीे न्यायालयाद्वारे चालविण्यात यावा, हल्लेखोरांवर ३०७ कलम लावावी, गावात सशस्त्र पोलीस चौकी द्यावी, हल्ल्यातील जखमींना आर्थिक मदत मिळावी, छेडखानी करण्यात आलेल्या महिलांना एस.सी., एस.टी. कायद्याप्रमाणे मदत करावी, ग्रामस्थांवरील लावलेले गुन्हे मागे घेणे, गोतस्करीत वापरलेले ट्रक तात्काळ जप्ती करणे, फरार आरोपींना अटक झालेल्या लाठीहल्ल्याची चौकशी करावी अशी मागणी आहे. तसेच सर्वात शेवटी आणि महत्वाचे म्हणजे भंडारा जिल्ह्यातील गुरांच्या बाजारातून होणाऱ्या गोस्तकरी अड्यांवर कारवाई करून वापरण्यात येणाºया वाहनाचे परवाने रद्द करण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सौंदड पुनर्वसन वासीयांनी पोलिसांना तात्काळ मदत मागितली होती. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ मदतीचा हातही दिला नाही.
फरार आरोपींना अटक झाली असती तर मोर्चा निघाला असता काय, असाही सवाल यावेळी उपस्थितांनी केला. अशा प्रकारच्या घटनेचा निषेध करून पायबंध घालण्यासाठी तसेच शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मोर्चा काढला असल्याचे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले.