आवळी नदीपात्रातून रेतीचा उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 09:43 PM2018-11-28T21:43:45+5:302018-11-28T21:44:06+5:30
मध्यरात्री सुमारास जेसीबी व ट्रँक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर साठा केलेली रेती टिप्पर मध्ये लोड करून नागपुरला पाठविली जात आहे. माञ महसुल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदुर : मध्यरात्री सुमारास जेसीबी व ट्रँक्टरच्या साहाय्याने रेतीचा उपसा करून शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर साठा केलेली रेती टिप्पर मध्ये लोड करून नागपुरला पाठविली जात आहे. माञ महसुल विभाग व पोलीस प्रशासनाकडून कसल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही.
तालुक्यात विहीरगाव गट ग्रामपंचायतीत येत असलेल्या आवळी गावाला वेढलेल्या चुलबंद व वैनगंगा नदी पाञाच्या फाट्यातुन दररोज लाखांदुर तालुक्यातील सहा ट्रँक्टर चालकांकडून तस्करी होत आहे. यात राजरोसपणे रात्री सुमारात जेसीबीच्या सहाय्याने ट्रँक्टरने रेतीची डंपींग करून फाट्यालगतच्या शेतात रेतीचा साठा केला जातो. त्यानंतर लाखांदुर तालुक्यातील व पवनीच्या रेती माफीयांच्या माध्यमातून साठा केलेली रेती टिप्परच्या साहाय्याने नागपुरला पाठविली जात आहे.
ट्रँक्टरद्वारे रेतीचा उपसा नित्यानेच केला जात असून, मागिल एक महिण्यापासून हा प्रकार चालु आहे. नुकत्याच पंधरा दिवसापुर्वी लाखांदुरचे पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम व त्यांच्या टीमने आवळी येथून नागपुर रेती घेऊन जात असलेले तिन टिप्पर पकडून कारवाई केली आहे. मात्र रेती भरलेले टिप्पर पकडल्यानंतरही रेती माफीयांनी रेती वाहतुकीचा धंदा चालूच ठेवला असून, पुन्हा ह्या धंद्याला वेग आला आहे. कृषी पंपांना लोडसेडींग फटका सहन करावा लागत असल्याने गावातील कृषी पंपधारकांना रात्री बेरात्री पंप चालु करण्यासाठी शेतावर जावे लागते आहे.
या दरम्यान रेती चोरटे मध्यरात्री सुमारास धुमाकूळ घालत असल्याने शेतकरी शेतावर जाणे टाळत असल्याचे दिसून येत आहे.
गावातुन प्राप्त माहितीनुसार रेती माफीयांची टोळी मोठी असून, रेतीचे टिप्पर तालुक्याबाहेर काढतांना मोठी 'फिल्डींग' लावल्या जात असते. नित्यानेच होत असलेल्या रेती वाहतुकीमुळे शासनाचा लाखो रूपयाचा महसुल पाण्यात बुडत आहे. मात्र याकडे महसुल विभाग व पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष करत बघ्याची भूमिका घेतली आहे.