इंधन वाचवा, देश वाचवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:40 AM2021-02-20T05:40:37+5:302021-02-20T05:40:37+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साकोली आगारामध्ये इंधन बचत मासिक समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते ...
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या साकोली आगारामध्ये इंधन बचत मासिक समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी साकोली आगार व्यवस्थापक गौतम शेंडे होते. मुख्य मार्गदर्शक प्राचार्य घनश्याम निखाडे, तर प्रमुख अतिथी सहायक वाहतूक अधीक्षक साखरवाडे, शेळमाके यांच्यासह चालक, वाहक, यांत्रिके, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते. प्राचार्य निखाडे यांनी इंधनाचा कमीत कमी कसा वापर करता येईल व इंधनाची बचत कशी करता येईल, या विषयावर मार्गदर्शन केले. त्यामध्ये एअर फिल्टर नेहमी स्वच्छ ठेवावे, टायर प्रेशरची नेहमी तपासणी करावी, उन्हाळ्यामध्ये आवश्यकता असल्यास एसीचा वापर करावा, स्पार्क प्लग्स नेहमी स्वच्छ करावे, गीअर बदलवण्यासाठी क्लच पॅडलचा वापर करावा. त्यावर स्वार होऊ नका, ब्रेकच्या कमी वापरासाठी वेग नियंत्रित ठेवावा, त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला गाडी सुरू ठेवून कोणाशी बोलणे टाळावे, कच्च्या तेलाचे साठे दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्याचे कारण म्हणजे वाढती उष्णता आहे.
आगार व्यवस्थापक शेंडे यांनी चालक, तसेच वाहकांना थांबा नसेल तिथे गाडी थांबवू नये, आपल्या गाडीची सुरक्षितता पाहूनच गाडी थांबवाची. आपण आपल्याबरोबर पन्नास लोकांचा परिवार सोबत घेऊन जात असतो, त्यासाठी गाडीवरून आपले संतुलन ढळणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्याचबरोबर इंधन बचतीमध्ये महाराष्ट्रातून, तसेच भंडारा जिल्ह्यातून प्रथम मानांकन साकोली आगाराला मिळाला. त्याचे सर्व श्रेय त्यांनी साकोली आगारातील कर्मचाऱ्यांना दिले. त्याचबरोबर सत्र २०२०-२१ मध्ये पुन्हा प्रथम क्रमांक अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. कार्यक्रमामध्ये जवळपास ५० कर्मचारी उपस्थित होते.