‘सावित्रीच्या’ लेकींचा प्रवास खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 10:35 PM2018-01-07T22:35:47+5:302018-01-07T22:36:28+5:30

सावित्रीच्या लेकींचा शाळेचा प्रवास सुखरुप व सुरक्षित व्हावा यासाठी एस.टी. बस मधील सहा आसने विद्यार्थींनीसाठी राखीव ठेवण्यात येत असते.

'Savitri' Lekhi's travel difficult | ‘सावित्रीच्या’ लेकींचा प्रवास खडतर

‘सावित्रीच्या’ लेकींचा प्रवास खडतर

Next
ठळक मुद्देआदेशाला तिलांजली : मुलींकरिता राखीव आसने बेपत्ता

राहुल भुतांगे ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : सावित्रीच्या लेकींचा शाळेचा प्रवास सुखरुप व सुरक्षित व्हावा यासाठी एस.टी. बस मधील सहा आसने विद्यार्थींनीसाठी राखीव ठेवण्यात येत असते. मात्र, शासनाच्या या आदेशाला एस.टी. कर्मचाºयातर्फे एस.टी. बस मधून उभे राहूनच प्रवास करावा लागत आहे.
तुमसर तालुक्यातील ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात मुली, विद्यार्थींनी रोज तालुक्याच्या ठीकाणी शहरात एस.टी. बसेसने मासिक पास काढून येत असतात. या प्रवासादरम्यान विद्यार्थींनीना चांगली सुविधा मिळावी यासाठी एस.टी. बसमध्ये सहा आसने विद्यार्थींनी मुली साठी राखीव ठेवण्यात येणार होती तसेच याची काटेकोर अंमलबजावणी शाळा, महाविद्यालये सुरु होताच करण्यात येणार होती.
त्यामुळे शासनाच्या निर्णयाने एस.टी. बसमधून प्रवास करणाऱ्या विद्यार्थींनीचा प्रवास सुखकर होणार होता. मात्र एस.टी. कर्मचारी, चालक वाहक व काही प्रवाशांच्या आडमुठेपणामुळे सावित्रीच्या लेकिना राखीव आसने तर सोडाच बसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. ग्रामीण भागातून शहरात शिक्षणासाठी येणाºया मुलींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना शिक्षणासाठी प्रवास करताना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा प्रवासात ताटकळत उभे राहू नये, यासाठी बसमधील आसने राखीव ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार बसमधील आसन क्र. ७ ते १० व आसन क्र. १५ व १६ ही सट असते. शाळकरी मुलीसाठीच राखीव ठेवण्यात आली आहेत. परंतु या निर्णयाची प्रत्यक्षात अमंलबजावणी होत नसल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत असल्याने सावित्रीच्या लेकीचा एसटीत प्रवास उभ्याने होत आहे. या निर्णयाची अंमलबजावणी केव्हा होते, याकडे सर्व विद्यार्थींनीचे लक्ष लागून आहे. अलीकडेच सावित्रीबाई जंयती साजरी करण्यात आली. मात्र आजही त्यांच्या लेकींना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या विषयी आगार व्यवस्थापक अनिल आमनेकर याच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: 'Savitri' Lekhi's travel difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.