सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य आजही प्रेरणादायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:29 AM2021-01-04T04:29:15+5:302021-01-04T04:29:15+5:30
भंडारा जिल्हा परिषद सभागृहात आयोजित सावित्री उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ...
भंडारा जिल्हा परिषद सभागृहात आयोजित सावित्री उत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझडे, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसंगे, सहायक आयुक्त समाजकल्याण आशा कवाडे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पानझडे म्हणाले, महिलांनी सावित्रीबाईंचे विचार आत्मसात करणे खूप आवश्यक आहे. त्यावेळच्या विपरित परिस्थितीत अंधश्रध्दा, बालविवाह, शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य मोलाचे आहे. अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांचेही कार्य महत्त्वाचे असून, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात त्यांचे चांगले योगदान लाभत आहे.
जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे म्हणाले, वेगवेगळ्या क्षेत्रात महिला पुढे आल्या आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून महिलांना आर्थिक साक्षर बनविण्याचे काम सुरू आहे. महिला बचत गटातील महिलांनी संचार बंदीच्या कालावधीत उत्तम कार्य केले आहे. बचत गटातील महिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्यावे.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनीषा कुरसुंगे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, कोरोना कालावधीत आशासेविका, अंगणवाडी सेविका व बचत गटातील महिलांनी आपल्या परिवाराची चिंता न करता उत्तम कार्य केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या या महिला कौतुकास पात्र आहेत.
यावेळी कोरोना संकटकाळात उत्तम कार्य करणाऱ्या अंगणवाडी सेविका मंदा गाढवे, विजया सार्वे, शारदा झोडे, सुनंदा चौधरी, करिश्मा उईके, पोषण आहार अभियानमध्ये चांगले कार्य केल्याबद्दल अंगणवाडी सेविका सुजाता धारगावे, भारती राजुरकर, पर्यवेक्षिका वर्षा मेंढे, शकुंतला निमकर, गीता उके, तर कुपोषण निर्मुलनामध्ये उत्तम कार्य केल्याबद्दल पर्यवेक्षिका छाया ढोरे व अंगणवाडी सेविका नलिनी आकरे, आधार सिडींगमध्ये चांगले कार्य केल्याबद्दल अंगणवाडी सेविका राणी कुर्वे, माझी कन्या भागश्री योजनेमध्ये चांगले कार्य केल्याबद्दल पर्यवेक्षिका पुष्पा रामटेके, अंगणवाडी सेविका निर्मला भालेराव, तर बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत दोन मुलींवर शस्त्रक्रिया करणाऱ्या पालकांचा यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात सत्कार करण्यात आला. बाल विकास प्रकल्प अधिकारी योगीता परसमोडे यांनी संचालन केले. जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विजय नंदागवळी यांनी आभार मानले.