अनुसूचित आयोग सदस्यांनी आाश्रमशाळांची केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 10:58 PM2017-09-02T22:58:01+5:302017-09-02T22:58:47+5:30
आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आंबागड व पवनारखारी येथील आश्रमशाळांना राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या मायाताई इनवाते यांनी वरिष्ठ अधिकाºयांसोबत शनिवारी भेट देऊन पाहणी केली. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या मृत्युप्रकरण व मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास शाळा प्रशासन अपयशी व चौकशीदरम्यान आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत त्यांनी दिले.
बापूजी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत ३० जुलैला महेंद्र सलामे (१५) रा. खैरी ता. तिरोडा याचा शॉक लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणात दोषीवर अद्याप कारवाई झाली नाही. संबंधितास अटक करणे व शाळा बंद न केल्यास ७ सप्टेंबरला कुलूप ठोको आंदोलनाचा इशारा भाजपच्या आदिवासी आघाडीतर्फे देण्यात आला आहे. या घटनेला शाळेचे संचालक मंडळ, सचिव, अध्यक्ष, उपाध्यक्ष, अधीक्षक यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात आला, परंतु अजुनपर्यंत अटक झाली नाही. महावितरणचे उपसहायक अभियंता, गोबरवाही व लाईनमेन यांच्यावर कारवाई झाली नाही. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला १० लाख रूपयांची आर्थिक मदत देण्यात यावे, संबंधित अभियंता व लाईनमेनवर फौजदारी गुन्हा नोंद करून अटक करण्यात यावी, शाळेवर नियंत्रण न ठेवणाºया आदिवासी प्रकल्प अधिकाºयांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी संघटनेने केली.
पवनारखारी येथील इंदिराबाई मरस्कोल्हे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंश, पाण्यात बुडून, जळून आणि आजार अशा घटनेत सहा विद्यार्थ्यांचा जीव आतापर्यंत गेला आहे. तत्कालीन आदिवासी प्रकल्प अधिकाºयांनी तीन वर्षापुर्वी शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. तरीसुद्धा ही शाळा सुरू आहे. आंबागड व पवनारखारी या आश्रमशाळांची उच्चस्तरीय चौकशी करून बंद करण्याची मागणी केली आहे.
आंबागड शाळेच्या घटनेला एक महिना होत आहे. येथे आदिवासी समाजाची व संघटनेची दिशाभूल करणे सुरू आहे. ७ सप्टेंबरला आंदोलनाला सुरूवात करून बेमुदत उपोषण, मोर्चा व शाळेला कुलूप ठोको आंदोलन करण्यात येईल, असे आदिवासी आघाडी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिसन सयाम, महासचिव अशोक उईके, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत सलामे, दिनेश मरस्कोल्हे, माजी पंचायत समिती सदस्य प्रभा पेंदामसह पालकांनी मायाताई इनवाते यांच्याजवळ व्यक्त केली. शाळांना भेटीपूर्वी समिती सदस्य माया इनवाते खापा येथील विश्रामगृहात अधिकारी, आघाडीचे पदाधिकारी व पालकांसोबत चर्चा केली. यावेळी प्रकल्प अधिकारी बी.पी. पृथ्वीराज, तहसीलदार गजेन्द्र बालपांडे, नायब तहसीलदार निलेश गौड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
आंबागड व पवनारखारी आश्रमशाळेची तक्रारीत नमूद सर्व बिंदूची सविस्तर चौकशी करण्यात येईल, कर्तव्यात कसूर नियमबाह्य कामे करण्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
-मायाताई इनवाते, सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, नवी दिल्ली.