शिष्यवृत्ती परीक्षा ही तर विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:42+5:302021-02-13T04:34:42+5:30
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात आयोजित महाकरियर पोर्टल मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ...
लाखनी तालुक्यातील पिंपळगाव येथील स्नेहा कन्या विद्यालयात आयोजित महाकरियर पोर्टल मार्गदर्शन शिबिराप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डाएट भंडाराचे अधीक्षक राजू बावणे, मुख्याध्यापक गीता बोरकर, शिक्षक भीमराव मेश्राम, विलास कालेजवार, सुभाष कापगते उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नरेंद्र चौधरी यांनी विद्यार्थ्यांना महाकरियर पोर्टलमध्ये असणारे व्यवसाय शिक्षण, कॉलेजप्रवेश, शिष्यवृत्त्या व त्यावर आधारित स्पर्धा परीक्षेची तयारी कशा पद्धतीने करता येते याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अधीक्षक राजू बावणे यांनी मुलींना विविध प्रश्न विचारून त्यांच्या अभ्यासाची पडताळणी करून आपण अभ्यास करताना कोणत्या घटकांचा कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे व तो कायम स्मरणात राहण्यासाठी वारंवार कशी उजळणी केली पाहिजे यावर मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक गीता बोरकर यांनी विद्यार्थिनींना आपल्या आवडीनुसार शिक्षणातील विविध अभ्यासक्रम निवडीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी महाकरियर पोर्टलमध्ये कशा पद्धतीने लॉगिन करून यामध्ये सातत्य राखता येईल याबाबत प्रश्न विचारले. कार्यक्रमासाठी सहायक शिक्षिका प्रेरणा कंगाले, वैभवी गोमासे, छबिलाल गिरीपुंजे, श्रीराम सार्वे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. संचालन शिक्षिका प्रेरणा कंगाले यांनी केले, तर आभार वैभवी गोमासे यांनी मानले.