चिखल तुडवत जावे लागते शाळेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:14 PM2018-07-23T23:14:47+5:302018-07-23T23:15:05+5:30
गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७०० लोकवस्ती असलेल्या गावाला बसत आहे. शासन व प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : सिवनी (तुमसर) : गावाला जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वेने उड्डाणपुलाचे काम सुरू केले. परंतु पर्यायी व्यवस्था न केल्यामुळे चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका ७०० लोकवस्ती असलेल्या गावाला बसत आहे. शासन व प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.
तुमसर शहरापासून अवघ्या तीन कि़मी. अंतरावर सिवनी हे ७०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याकरिता जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. गाव शिवारातून तुमसर तिरोडी रेल्वे ट्रॅक आहे. रेल्वे प्रशासनाने येथे उड्डाणपूल तयार करीत आहे. येथील ग्रामस्थांना तुमसर शहरात जाण्याकरिता हा एकमेव रस्ता आहे. पावसाळा सुरू झाला. उड्डाणपूलाकरीता जूना रस्ता खोदण्यात आला. या खड्ड्यात कंबरभर पाणी साचले आहे. सध्या चिमूकल्या विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
यासंदर्भात रेल्वे प्रशासनाला निवेदन तथा तक्रारी देण्यात आल्या. परंतु रेल्वे प्रशासनाने लक्ष दिले नाही. ग्रामस्थ येथे आंदोलनाच्या मार्गावर आहेत. तुमसर तालुक्यात आतापर्यंत केवळ ५२७ मि.मी. पाऊस पडला. जोरदार पावसात या खड्ड्यातून मुळीच जाता येणार नाही. पर्यायी रस्ता नसल्याने ग्रामस्थांचा शहराशी संपर्क तुटणार आहे. रेल्वे प्रशासनाने पर्यायी रस्ता तयार न करता उड्डाणपुलाचे काम येथे सुरू केले.
स्थानिक महसूल प्रशासनाचेही येथे दुर्लक्ष दिसत आहे. युवती, महिला, वृद्ध पुरूषांना पाण्यातून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे ग्रामस्थात प्रचंड रोष व्याप्त आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही अशा तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.
सध्या रेल्वेने उड्डाणपुलाचे बांधकाम बंद केले आहे. पावसाळ्यापुर्वी येथे बांधकामाला सुरूवात करण्यात आली. किमान पावसाळाभर जीवघेण्या पाण्यातूनच ग्रामस्थांना प्रवास करावा लागणार आहे. आधी पर्यायी रस्ता व नंतर नवीन रस्ता बांधकाम असा शासनाचा नियम आहे. या नियमाला येथे तिलांजली देण्यात आली. परंतु हा जाब कोण वचिारणार हाच मुख्य प्रश्न आहे. स्थानिक महसूल विभागाशी उड्डाणपूल बांधकामापूर्वी रेल्वेने साधी चर्चा केली नाही, अशी माहिती पुढे आली आहे. येथे रेल्वे व स्थानिकांचा रस्त्यासंदर्भात समस्या असल्याचे समजते.
महसूल विभागाने प्रत्यक्षात मौका चौकशी करून पाहणी केली. पर्यायी रस्त्याकरीता भूसंपादन प्रक्रिया करण्याचा अहवाल तयार केला. परंतु भूसंपादन करण्याकरीता अडचणी निर्माण होत आहेत.
रेल्वेने पर्यायी रस्ता न करता प्रत्यक्ष उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू केले. मौका चौकशीनंतर पर्यायी रस्ता रेल्वेने तयार करण्याचा अहवाल रेल्वेला दिला. रेल्वेने तो मंजूर केला. येथे संपादन प्रक्रिया सुरू आहे, परंतु शेतकºयांचा विरोध सुरू असून त्यांना रेल्वेने मोबदला द्यावा, त्यानंतरच येथे तोडगा निघेल.
-गजेंद्र बालपांडे,
तहसीलदार तुमसर.