शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचा मोर्चा
By admin | Published: March 5, 2017 12:32 AM2017-03-05T00:32:25+5:302017-03-05T00:32:25+5:30
शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १५००० रूपये मानधन लागू करावे, थकीत मानधन देण्यात यावे ...
शिक्षणमंत्र्यांना निवेदन : मानधन वाढविण्याची संघटनेची मागणी
भंडारा : शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १५००० रूपये मानधन लागू करावे, थकीत मानधन देण्यात यावे या मागण्यासाठी आयटक प्रणित शालेय पोषण आहार कर्मचारी युनियनच्यावतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला.
मागण्यांमध्ये राष्ट्रीय स्तरावर या कामगारांना १५००० रूपये मासिक वेतनाची मागणी केली असली तरी आश्वासना प्रमाणे ५००० रूपये मानधन, थकीत मानधन व मार्च-एप्रिलचे मानधन देण्यात यावे, आकृती बंधात अन्याय कारक तरतुदी दुरुस्त करण्यात यावी, १२ महिन्याचे मानधन देण्यांत यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना गणवेश व परिचय पत्र देण्यात यावे, या कर्मचाऱ्यांचे मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे या मागण्यांचा समावेश आहे. मोर्चाचे नेतृत्व युनियनचे अध्यक्ष शिवकुमार गणवीर, आयटकचे अध्यक्ष माधवराव बांते व कार्याध्यक्ष हिवराज उके यांनी केले. यावेळी तालुका सचिव दमयंता बोरकर, सुनिता, भलावी, भाग्यश्री उरकुडे, रिना राऊत, शिळा गयगये, शेवंता खापरीकर, प्रतिमा कान्हेकर, वामनराव चांदेवार, राजू बडोले यांचा समावेश होता.आंदोलनाच्या ठिकाणी शिवकुमार गणवीर व हिवराज उके यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणमंत्र्यांच्या नावे मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. फेब्रुवारी पर्यंतचे थकीत मानधन, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवित असल्याचे आश्वासन देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)