'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याचा राग अनावर, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2022 05:20 PM2022-01-06T17:20:03+5:302022-01-06T17:40:56+5:30

शाळेत विद्यार्थ्यांनी शिक्षकाला 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवले. यामुळे रागाच्या भरात शिक्षकाने एका विद्यार्थ्याला मारहाण करत बेंचवर डोके आपटले, यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला.

school student brutally beaten up by teacher | 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याचा राग अनावर, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याचा राग अनावर, विद्यार्थ्याला बेदम मारहाण

Next
ठळक मुद्देशिक्षकावर गुन्हा दाखललाल बहादूर शास्त्री शाळेतील प्रकार

भंडारा : विद्यार्थ्यांनी शिक्षकाला 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडवल्याने शिक्षकाचा राग अनावर होऊन त्यांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आंधळगाव येथील लाल बहादूर शास्त्री शाळेत घडली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध मुलांची काळजी व संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद बडवाईक (५५) रा. आंधळगाव हे लाल बहादूर शास्त्री शाळेत गणित व मराठी शिक्षक आहेत. सहावी ते आठवीला शिकवितात. त्यांना काही विद्यार्थांनी 'बंडू बाॅक्सर' म्हणून चिडविले. त्यामुळे त्याचा राग अनावर झाला. व त्यांनी रागात अहमद सलीम गोडील (१३) या विद्यार्थ्याला लाकडी दांड्याने मारहाण केली. तसेच त्याचे डोक्याचे केस पकडून बेंचवर आदळले. त्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला.

याप्रकरणी त्याची आई तरन्नूम सलीम गोडील (३४) रा. गणेश नगरी भंडारा यांनी भंडारा ठाण्यात तक्रार दाखल केली. मुले नेहमीच असा प्रकार करून शिक्षकांना चिडवित असल्याची माहिती आहे. त्यामुळेच बडवाईक यांचा राग अनावर झाल्याचे सांगण्यात आले. भंडारा पोलिसांनी शिक्षक शरद बडवाईक यांच्याविरुद्ध भादंवि ३२४, ३२३ कलमांसह मुलांची काळजी व संरक्षण कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास हवालदार वरकडे करीत आहेत.

Web Title: school student brutally beaten up by teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.