शालेय विद्यार्थीच निघाले चोरटे
By admin | Published: October 8, 2015 12:25 AM2015-10-08T00:25:09+5:302015-10-08T00:25:09+5:30
तुमसर शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मध्यरात्री साहित्य चोरी करणारे शालेय विद्याथ्याऱ्ंची एक टोळी तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतली.
मुद्देमाल जप्त : तीन मुलांचा समावेश
तुमसर : तुमसर शहरातील एका खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून मध्यरात्री साहित्य चोरी करणारे शालेय विद्याथ्याऱ्ंची एक टोळी तुमसर पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यांच्याकडून ६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शाळेतून संस्काराचे धडे गिरविले जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी त्यांचा सत्कार करण्यात येतो. भावी पिढी म्हणून विद्यार्थ्यांकडे समाज बघतो. तुमसर शहरातील मुख्य रस्त्यापासून (देव्हाडी) हाकेच्या अंतरावरील प्रोग्रेसिव्ह इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेतून तीन शालेय अल्पवयीन विद्यार्थ्यांनी दि. २ आॅक्टोबरच्या मध्यरात्री चोरी केली. यात जुना टाईपराईटर, चार पंखे, दोन स्पीकर, रजिस्टर, कागदांचा रोल असा ६ हजार ५०० रुपयांच्या साहित्याचा समावेश होता.
तुमसर पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून मुद्देमाल हस्तगत केले. ते तिन्ही विद्यार्थी शहरातील विविध शाळांचे विद्यार्थी आहेत. त्यांच्याकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश हावरे, कॉन्स्टेबल जयसिंग लिल्हारे, गिरीश पडोळे, कैलाश पटोले यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)