शालेय विद्यार्थी धुतात पोषण आहाराची भांडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 12:28 AM2017-12-24T00:28:19+5:302017-12-24T00:28:29+5:30

लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया तावशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क पोषण आहाराची भांडी धुऊन घेतली जात आहेत. ज्या हातात पुस्तक, पेन असायला हवे, त्या हातात शाळेतील शिक्षकांनी पोषण आहाराची भांडी धुण्यास भाग पाडले.

School students wash nutrition diet utensils | शालेय विद्यार्थी धुतात पोषण आहाराची भांडी

शालेय विद्यार्थी धुतात पोषण आहाराची भांडी

Next
ठळक मुद्देपालक संतप्त : तावशी जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील प्रकार

रविंद्र चन्नेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत येणाºया तावशी येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थ्यांकडून चक्क पोषण आहाराची भांडी धुऊन घेतली जात आहेत. ज्या हातात पुस्तक, पेन असायला हवे, त्या हातात शाळेतील शिक्षकांनी पोषण आहाराची भांडी धुण्यास भाग पाडले. या किळसवाण्या प्रकारामुळे तावशी परीसरात रोष व्यक्त केला जात आहे.
तावशी येथील जिल्हा परिषद शाळेत शेकडो विद्यार्थी विद्यार्जनासाठी येत असतात. शाळेतील मुलांची पटसंख्या कमी होऊ नये, याकरीता शासनाने अनेक कल्याणकारी योजना राबवित आहे. शाळेत विद्यार्थ्यांची अधिक उपस्थिती राहावी, याकरिता शाळेत मध्यान्ह भोजन देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र गत १५ दिवसांपासून विद्यार्थ्यांना केवळ पांढरा भात दिला जात होता. विद्यार्थी शाळेतील भात खाण्यासाठी भाजी घरून आणावी लागत होती. या प्रकाराबद्दल माहिती घेतली असता शासनाकडून आहाराचे देयक थकित असल्यामुळे मुलांना केवळ भात दिला जात होता. मात्र दोन दिवसांपासून आहार पुरवठा सुरक्षित असल्याचे दिसून आले. शनिवारला विद्यार्थ्यांना मध्यान्ह पोषण आहार वाटप करण्यात आले. मात्र भांडी स्वत: विद्यार्थीच धुऊन स्वच्छ करत असल्याचे लक्षात येताच 'लोकमत'ने या प्रकाराची माहिती मुख्याध्यापक सिंधीमेश्राम यांना दिली. वीज पुरवठा खंडित असल्यामुळे शाळेत पाणी उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जेवनानंतर आपली भांडी स्वत: धुऊन ठेवावी, असे बजावण्यात आले. ऐन थंडीत कुडकुडत विद्यार्थ्यांनी आपली उष्टी भांडी धुताना आढळली. पोषण आहाराची भांडी आहार शिजविण्याकरिता असलेल्या स्वयंपाकी महिलेकडून धुऊन घेतली जातात. त्याकरिता शासनाकडून या स्वयंपाकी महिलांना मानधन दिले जाते. शाळेत होणाºया गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती, ग्राम शिक्षण समिती अशा अनेक समिती शासनाकडून नेमण्यात येतात. मात्र या समित्या आपली जबाबदारी योग्य रितीने सांभाळतात काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच शिक्षक मुख्यालयी न राहता स्व:गावावरून 'अपडाऊन' करीत आहेत. शाळेचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांनाच उघडावे लागते. शाळेतील केरकचरा सुद्धा विद्यार्थ्यांना गोळा करावा लागतो. वर्गखोल्याची स्वच्छता विद्यार्थीच करतात. यावरून मुले शाळा शिकण्यासाठी येतात की शाळेची कामे करण्याकरिता, असा गंभीर प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणावर वरिष्ठ पांघरून घालणार की कारवाई करणार, याकडे तावशीवासीयांचे लक्ष लागले आहे.

विद्युत पुरवठा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:च्या भोजनाची ताटी स्वत: धूण्यास सांगितले. शाळेत पाणी नसल्यामुळे शाळेजवळील बोअरवेलवर विद्यार्थी भांडी धूतात. पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी माझी नाही.
- व्ही.आर. सिंधीमेश्राम, मुख्याध्यापक जि.प. शाळा तावशी.

Web Title: School students wash nutrition diet utensils

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.