ग्रामीण भागातील शाळा प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवितात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2022 05:00 AM2022-04-10T05:00:00+5:302022-04-10T05:00:48+5:30

डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,ओबीसींनी आपले संविधानिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळणार नाही. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे, संस्थेतर्फे ॲड. अभिजित वंजारी व डॉ. बबनराव तायवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 

Schools in rural areas produce honest students | ग्रामीण भागातील शाळा प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवितात

ग्रामीण भागातील शाळा प्रामाणिकपणे विद्यार्थी घडवितात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कोंढा (कोसरा) : शैक्षणिक क्षेत्रात खाजगी शाळांचे मोठे योगदान आहे. ते ग्रामीण भागात उत्तम प्रकारे शिक्षण देऊन चांगले नागरिक घडविण्याचे कार्य करीत आहे. असे प्रतिपादन आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केले.
 पवनी तालुक्यातील कोंढा येथील गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हरिकेश सभागृह व बास्केटबॉल कोर्टचे उद्घाटन शनिवार रोजी करण्यात आले. त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी मुख्य पाहुणे म्हणून राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे होते. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष ॲड. आनंद जीभकाटे  होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र कावडे, सहसचिव सुदाम खंडाईत, कोषाध्यक्ष मनोहर देशमुख, विश्वस्त विकास राऊत, प्रा. सुभाष पडोळे, देवानंद मोटघरे, ओबीसी महासंघाचे सचिव शरद वानखेडे, उपाध्यक्ष विनायक तुपकर, पंढरीभाऊ सावरबांधे, प्रकाश पचारे, संजीवनी जिभकाटे, प्राचार्य देवानंद चेटुले, मुख्याध्यापक ओमप्रकाश वैद्य, डॉ. खंडेलवाल, प्रा. सुधाकर बोरकर, डॉ. कल्पना बोरकर, प्राचार्य ममता गिऱ्हपुंजे उपस्थित होते. 
डॉ. बबनराव तायवाडे म्हणाले,ओबीसींनी आपले संविधानिक हक्क मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांना त्यांचे अधिकार मिळणार नाही. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन शिक्षण दिले पाहिजे, संस्थेतर्फे ॲड. अभिजित वंजारी व डॉ. बबनराव तायवाडे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
तसेच संस्थेतर्फे गांधी विद्यालय कोंढा येथील विद्यार्थी समीर हरिहर कुर्झेकर हा विद्यार्थी एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे  त्याची निवड झाली तसेच कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अतुल बोरकर यांनी सेवा दिली म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला. संचालन रतन लांडगे, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक ओमप्रकाश वैद्य यांनी केले. कार्यक्रमास गांधी शिक्षण संस्था कोंढा अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व शाळांतील विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.

 

Web Title: Schools in rural areas produce honest students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :MLAआमदार