अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 12:20 AM2017-12-31T00:20:47+5:302017-12-31T00:21:02+5:30
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ सालापासून समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक तथा जादुटोना विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे कार्य करीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती १९८२ सालापासून समितीचे संस्थापक, राष्ट्रीय संघटक तथा जादुटोना विरोधी कायद्याचे रचनाकार प्रा. श्याम मानव यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतात प्रबोधनाचे कार्य करीत आहे. समिती कुठल्याही देवा धर्माला विरोध न करता समाजातील अनिष्ठ प्रथा आणि अंधद्धांच्या निर्मूलनासाठी व वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविण्यासाठी प्रयत्न करते, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंनिसचे युवा शाखेचे महाराष्ट्र राज्य संघटक पंकज वंजारे यांनी केले.
अ.भा. अंनिस व रासेयो भंउारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय जादूटोना विरोधी कायदा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विषयावर आयोजित युवा प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. कार्तिक पनीकर, प्रशासकीय प्रमुख जे.एम. पटेल महाविद्यालय भंडारा, प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. राजेंद्र शहा, जिल्हा समन्वयक रासेयो भंडारा प्रा. ममता वासनिक आजीवन अध्ययन केंद आणि विस्तार विभाग प्रमुख जे.एम. पटेल महाविद्यालय डी.जी. रंगारी उपाध्यक्ष अ.भा. अंनिस भंडारा जिल्हा कोषाध्यक्ष ए.बी. भोयर जि. महिला संघटक प्रिया शहारे, सोनिया डोंगरे उपस्थित होते.
पंकज वंजारे यांनी जादूटोना विरोधी कायद्याच्या अनुसुचीची विविध उदाहरण आणि प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून माहिती देताना सांगितले की, संतांनी व महापुरूषांनी केलेल्या प्रबोधनाचा सार या कायद्यात आलेला आहे. या कायद्याच्या प्रचाराची जबाबदारी युवकांनी आपल्या खांद्यावर घेत आदर्श समाज घडवण्याचे प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. कार्तिक पानीकर म्हणाले की, अ.भा. अंनिसचे कार्य अत्यंत महत्वाचे असून अशा प्रकारचे कार्य अत्यंत महत्वाचे असून अशा प्रकारचे शिबिर मोठ्या प्रमाणात आयोजित करण्याची आज गरज आहे.
डॉ. राजेंद्र शहा यांनी प्रास्ताविकात रासेयो अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सतत प्रसारित करत असते. सशक्त युवापीढी निर्माण करण्यासाठी युवकांनी विवेकवादी होण्याची, जागृती घडवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. प्रिया शहारे यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोनिया डोंगरे यांनी केले. यावेळी जे.एम. पटेल, आर.एम. पटेल, प्रगती महाविद्यालय, आठवले महाविद्यालय, पडोळे महाविद्यालय भंडारा येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अ.भा. अंनिस व रासेयो योजना यांच्या संयुकत विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज या विषयावर जिल्ह्यात महाविद्यालय तालुकास्तरावर वक्तृत्व स्पर्धा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केल्या जाणार आहे.