केशोरी मिरचीच्या कमाल उत्पादनासाठी शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या दारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:40 AM2021-09-12T04:40:49+5:302021-09-12T04:40:49+5:30
विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर व तालुका कृषी अधिकारी लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे ...
विकेल ते पिकेल या अभियानांतर्गत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ नागपूर व तालुका कृषी अधिकारी लाखनी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन लाखनी तालुक्यातील चुलबंद खोऱ्यातील वाकल येथे शुक्रवारी येथे पार पडले. यावेळी डॉ. रमाकांत गजभिये, डॉ. सुधीर बोरकर, डॉ. गिरीश निखाडे, तालुका कृषी अधिकारी किशोर पात्रीकर, सरपंच टिकाराम तरारे, मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर, अशोक जिभकाटे, मुकुंद खराबे, सचिन झंझाळ, नाकाडे, गजभिये, टिचकुले, आत्मा विभागाचे (बीटीएम) राऊत, सविता तिडके, वंदना भिवगडे, उपसरपंच नरेश कोचे, प्रगतशील शेतकरी यशवंत साखरे आदी शेतकरी बांधव उपस्थित होते.
सर्वसाधारणपणे पारंपरिक पद्धतीने बोट मिरचीचे उत्पन्न प्रति चार क्विंटलएवढे असते. यात खर्चसुद्धा अधिक असून शेतकऱ्यांना परवडण्याजोगे नसते. ही खंत तालुका कृषी अधिकारी के.जी. पात्रीकर यांनी हेरली. विशेष म्हणजे याच परिसरातील कृषी शास्त्रज्ञ मिरची पिकाच्या अधिक उत्पन्नासाठी परिचित असल्याने त्यांच्या ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा. या उदात्त हेतूने पाथरीकर यांनी वाकल येथे परिसंवाद घडवून आणला. चारही कृषी अभ्यासक पालांदूर परिसरातील असल्याने ‘विकेल ते पिकेल’ या अभियानात सहभागी झाले.
चौकट
डॉ. रमाकांत गजभिये यांनी केशोरी मिरची पिकाचे उत्पादन वाढविण्यासाठी शास्त्रोक्त पद्धत व तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. सुधीर बोरकर यांनी मिरची पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन विषयावर अभ्यास दिला. डॉ. गिरीश निखाडे यांनी मिरची पिकाचे बियाणे सुधारणा पद्धती व निसर्गाची समन्वय ठेवून उत्पादन घेण्याबाबत अद्ययावत ज्ञान दिले. किशोर पात्रीकर यांनी प्रकल्पाची पार्श्वभूमी सांगून शेतकऱ्यांनी मालाची विक्री एकत्रितपणे खरेदीदारास करावी. जेणेकरून उत्पादनास जास्त दर मिळेल व नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनात वाढ करून प्रकल्प यशस्वी करण्याचे आवाहन केले.