सिंचन विहिरी बनल्या शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास

By admin | Published: April 13, 2017 12:26 AM2017-04-13T00:26:33+5:302017-04-13T00:26:33+5:30

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना सिंचन विहिरीची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कामे सुरु केली आहेत.

The scum of farmers' irrigation scarcity | सिंचन विहिरी बनल्या शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास

सिंचन विहिरी बनल्या शेतकऱ्यांच्या गळ्याचा फास

Next

कामे सुरु पण संकेतांक मिळेना : अनेक शेतकऱ्यांची देयके रखडली, आर्थिक संकटात शेतकरी
लाखनी : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वैयक्तिक लाभाची योजना सिंचन विहिरीची शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कामे सुरु केली आहेत. परंतु पं.स. स्तरावरून सिंचन विहिर योजनेच्या कामाचे संकेतांक तयार होत नसल्याने सिंचन विहिरीची कामे करण्यात अडचणी निर्माण झाल्या असून सिंचन विहिरीची देयके रखडल्याचे शेतकऱ्यांपुढे नवीनच समस्या उद्भवली आहे.
शेतकऱ्यांच्या हिताकरिता शासन अनेक योजना आखते. परंतु या योजनेची अंमलबजावणी शासकीय अधिकारी व पदाधिकारी योग्यरित्या करीत नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी जनतेच्या हिताचा कितीही दिंडोरा पिटला तरी प्रशासकीय यंत्रणेमुळे संबंधित कामात आडथळा निर्माण होऊन शासनाच्या व शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना तशाच पडून राहतात व अनेक योजनांमधील धोरणात्मक निर्णयातील अभावामुळे लाभधारकावर नामुष्कीची पाळी येते. परिणामी शेतकरी आत्महत्या सारख्या प्रकारात आता दिवसेंदिवस वाढत होत आहे.
शासनातर्फे शेतकऱ्यांकरिता रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी देण्यात येत आहेत. परंतु या विहिरींच्या कामाचे संकेतांक मिळत नसल्याने थंडबस्त्यात पडले आहे. शासनाच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर काही पूर्ण बांधकाम झालेल्या विहिरींचे देयके प्राप्त न झाल्यामुळे शेतकऱ्यांसमोर बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना मानसिक व शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी ग्रामपंचायतच्या निर्देशानुसार सिंचन विहिरींची कामे सुरु केली व अकुशल कामाची मंजुरी पत्रके रोजगार सेवकांच्या सहाय्याने शासनास सादर केली आहेत.
परंतु आठ दिवसांचा कालावधी लोटूनही त्या हजेरी पत्रकांचा संकेतांक प्राप्त होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे नवीनच समस्या उद्भवली असून सुरु असलेल्या विहिरींची कामे बंद करण्यात येत आहेत.
तर झालेल्या कामाची मजुरी देण्यासाठी शेतकऱ्यांना नाकी नऊ येणार आहे. हमी कामांची मजुरी रोहयोतून देण्यात येत असली तरी वैयक्तिक लाभाच्या योजनेत मजूर लाभधारकांना जबाबदार धरूनच काम करण्यास तयार होत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला असून लोक प्रतिनिधींनी लक्ष देऊन हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणे आवश्यक गरजेचे आहे. यात शेतकऱ्यांवर आर्थिक ताण पडला असून शासनाने अनुदान त्वरीत द्यावे, अशी मागणी आहे. (शहर प्रतिनिधी)

हजेरी पत्रक व देयकांची संकेतांक निर्माण करताना येणारी वेळ न.रे.गा. च्या वेबसाईटला ओपन होत नसल्यामुळे हजेरी पत्रके निघण्यास मागील १५ दिवसांपासून अडचण निर्माण झाली आहे. व त्यामुळेच सन १६-१७ तील कामांची देयके रखडली आहेत.
-राहुल गिऱ्हेपुंजे,
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, म.गां.रा.रो.ह. योजना, पं.स. लाखनी.

Web Title: The scum of farmers' irrigation scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.