पालिकेने ठोकले वसतीगृहाला सील

By Admin | Published: October 2, 2016 12:29 AM2016-10-02T00:29:58+5:302016-10-02T00:29:58+5:30

नगर परिषद हद्दीतील इंदिरा नगर व विनोबा भावे नगरातील खाजगी इमारतीत सुरू असलेल्या ...

Sealed the hostel hosted by the corporation | पालिकेने ठोकले वसतीगृहाला सील

पालिकेने ठोकले वसतीगृहाला सील

googlenewsNext

२००६ पासूनचा कर थकीत : १ लाख ४१ हजार रुपयांची थकबाकी
तुमसर : नगर परिषद हद्दीतील इंदिरा नगर व विनोबा भावे नगरातील खाजगी इमारतीत सुरू असलेल्या शासकीय वसतीगृहाचे कर सन २००६ पासून थकीत होते. घरमालकांना वारंवार सुचना देवून ही थकीत कराचा भरणा न केल्याने शासकीय वसतीगृहाच्या गृहपाल कक्षाला पलिका प्रशासनाने सिल ठोकले. ही कारवाई २९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
स्थानिक इंदिरा नगर येथील मालमत्ता क्रमांक २०२ ही अंजनादेवी महेंद्रकुमार जैन यांच्या मालकीची आहे. तर विनोबा भावे नगरातील मालमत्ता क्र. ५४५ ही सुनिता शैलेंद्र जैन व सुरुची आलोककुमार जैन यांच्या संयुक्त मालकीची आहे. या दोन्ही इमारतीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह भाड्याने दिले आहे.
सुनिता जैन यांच्या ईमारतीवरील ४,७७,६४० रुपये सन २००६ पासून चालु वर्षासह कर थकीत होते. घर मालकांना पलिकेने वारंवार सुचना नोटीस देवूनही त्यांनी कराचा भरणा केला नाही.
परिणामी नगर पलिकेचे मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाणे यांच्या आदेशान्वये २९ सप्टेंबरला गृहपालच्या कक्षाला सिल ठोकण्याची कारवाई करण्यात आली.
यावेळी पालिकेच्या कर विभागाचे प्रमुख सुनिल लांजेवार, जमिल शेख, प्रदिप कुंभलकर, गोपाल साखरवाडे, राम कहालकर, निशीत गुप्ता, नसीर अली सैय्यद, मनोहर मेश्राम, दर्शन गाडगे, गजानन देशमुख, नंदकिशोर मेश्राम, डार्वीण राऊत व कर विभागातील कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Sealed the hostel hosted by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.