आमदारांकडून प्रकल्प अधिकाऱ्याची झडती

By Admin | Published: August 26, 2016 12:32 AM2016-08-26T00:32:53+5:302016-08-26T00:32:53+5:30

जिल्ह्यातील एकमेव शासकीय आश्रमशाळा खापा (खुर्द) येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली येथील निवासी विद्यार्थिनीने

Search for project officer from MLA | आमदारांकडून प्रकल्प अधिकाऱ्याची झडती

आमदारांकडून प्रकल्प अधिकाऱ्याची झडती

googlenewsNext

नेहा उईके आत्महत्या प्रकरण : आत्महत्येचे गूढ अद्याप कायम
आलेसूर : जिल्ह्यातील एकमेव शासकीय आश्रमशाळा खापा (खुर्द) येथे नेहा हनेश उईके (१४) रा.कारली येथील निवासी विद्यार्थिनीने वस्तीगृहातील कक्षेत पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. त्यामुळे गावखेड्यात पुन्हा गाड्यांच्या ‘रेला रे’ सुरु झाला आहे.
या प्रकरणाची तात्काळ दखल घेत आमदार चरण वाघमारे दोन दिवसापासून सखोल चौकशी करीत आहेत. यात प्रकल्प अधिकारी हरिराम मडावी यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरत तासभर घटनास्थळी झडती घेतली. अभ्यासू आमदार असल्यामुळे आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांना प्रश्न विचारले असता चांगलाच घाम फुटला. या घटनेचे पोलीस तपासाची चक्रे तीव्र गतीने फिरत असूनही आत्महत्येचे गुढ रहस्य कायम आहे.
या आश्रमशाळेत निवासी तथा अनिवासी मुले ७३ व मुली ८८ अशी एकूण १६१ पटसंख्या आहे. मात्र या घटनेच्या सावटात निम्मे विद्यार्थ्यांनी आपल्या पाऊलवाटा घराकडे वळविल्या आहेत. या आश्रमशाळेत पहिली ते दहावीपर्यंत शैक्षणिक सुविधा असूनही उपस्थितीअभावी कित्येक वर्गखोल्या ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या प्रकरणात आमदार चरण वाघमारे यांनी आश्रमशाळेची पाहणी केली. यात मूलभूत सुविधेअंतर्गत बऱ्याच समस्या दिसून आल्या. शाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, शिक्षक व कर्मचारीवृंद यांना प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिलेले निेर्देश जणू वेशीवर टांगल्याचे निष्पन्न झाले. परिणामी या घटनेत कोणाचे जहाज बुडते हा प्रश्न गुलदस्त्यात आहे. वस्तीगृहातील कोठीघरात तांदूळ, तुरडाळ, पुरवठाधारकाकडून उच्चतम गुणवत्तेचा नसून अप्रमाणित चाचणी न केलेला पुरवठा अन्न शिजविण्यात येणाऱ्या पाण्याचा ड्रममध्ये गढूळ पाणी, दैनंदिन आहारात फेरबदल, विद्यार्थ्यांना मिळणारे बेडींग साहित्य, जोडे मोजे नाईट ड्रेस, टॉवेल, दंतमंजन, साबण, खोबरेतेल, नास्ता या दैनंदिन व जीवनावश्यक वस्तूत रेकॉर्ड अंतर्गत बरीच तफावत आढळून आली.
शैक्षणिक गुणवत्तेअंतर्गत आमदार व विद्यार्थ्यांच्या संवादात, इंग्रजी, गणित व सामान्य ज्ञानात कित्येक प्रश्न अनुउत्तरीत होते. त्यामुळे बौद्धीक व सर्वांगिण विकासासाठी शिक्षकांची भूमिका बघ्याची ठरली. शासनाकडून दरवर्षी मिळणारा लाखो रूपयाचा निधी झिरपतो कुठे हा प्रश्न उभा झाला आहे. (वार्ताहर)
जिल्ह्यात पावसाची हजेरी
भंडारा : मागील २० दिवसांपासून बेपत्ता झालेल्या पावसाने भंडारा, तुमसर, लाखनी, साकोली परिसरात पावसाने हजेरी लावली. आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवे येत असली तरी पाऊस मात्र काही पडत नसल्याचे वास्तव आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांना नापिकीचा सामना करावा लागणार आहे.
याावर्षी पावसाने पहिलेपासूनच दगा दिला आहे. आतातरी पावसाने अंत पाहू नये यासाठी शेतकऱ्यांचे यज्ञ सुरू आहे. जन्माष्टमीपर्यंत पूर्ण होणारी रोवणी यावर्षी अर्ध्यावरच राहिली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Search for project officer from MLA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.