आजपासून शाळांच्या दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 05:00 AM2021-11-22T05:00:00+5:302021-11-22T05:00:12+5:30

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सलग जोडून घेतलेल्या राज्यातील अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवार, २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी शालेय शिक्षण विभाग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने त्यासंदर्भात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीविषयी अनुदानित खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता.

The second academic session of the school starts from today | आजपासून शाळांच्या दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात

आजपासून शाळांच्या दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात

Next

राजू बांते
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : दिवाळीनंतर राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी झाली. दोन दिवस शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा दिवाळीच्या सुट्ट्यांचा ब्रेक लागला होता. आता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ग्रामीण व शहरी भागातील शाळांची आजपासून दुसऱ्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत आहे. त्यामुळे शाळा पुन्हा गजबजणार आहेत.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर दिवाळीच्या सुट्ट्या सलग जोडून घेतलेल्या राज्यातील अनुदानित शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये सोमवार, २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी शालेय शिक्षण विभाग आणि त्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण उपसंचालक कार्यालयांमध्ये समन्वय नसल्याने त्यासंदर्भात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीविषयी अनुदानित खासगी आणि सरकारी शाळांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे खासगी आणि सरकारी शाळांनी आपली दिवाळीची सुट्टी २८ ऑक्टोबरपासून घेत शाळा ११ व १२ नोव्हेंबरपासून सुरू केल्या होत्या.
अनुसूचित जमाती कल्याण समिती, भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर २८ ते ३० ऑक्टोबरला येणार आहे आहे म्हणून शाळा सुरू ठेवण्याचे पत्र शिक्षण विभाग भंडारा काढून काढण्यात आले होते. शाळेत मुख्याध्यापकांसह शिक्षकांना तीन दिवस उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे प्रत्यक्षात १ नोव्हेंबरपासूनच दिवाळीच्या शिक्षकांना सुट्या मिळाल्या होत्या. त्या तीन सुट्या कुठेही समायोजित करण्यात आल्या नाहीत. तथापि, दिवाळीच्या सुट्ट्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणानंतर सलगपणे लावून घेता येतील, असे आदेश स्थानिक स्तरावर शिक्षण उपसंचालक कार्यालयाने काढल्यामुळे या शाळांनी १३ नोव्हेंबरपासून सलग २० नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी जोडून घेतली आहे. त्यामुळे या शाळा आज सोमवारपासून सुरळीतपणे सुरू होत आहेत.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणात दिवाळीच्या दोन सुट्या गेल्या होत्या. शाळांना स्थानिक स्तरावर दिवाळीच्या सुट्ट्या नाताळ अथवा इतर सणांच्या काळात जोडून घेण्यासाठी मुभा देण्यात आली होती. त्यामुळे प्राथमिक व माध्यमिक भंडारा शिक्षण विभाग व विविध शिक्षक, मुख्याध्यापक संघटनेने नाताळात २५ डिसेंबरला जोडून २३ व २४ डिसेंबर अशा जोडून दोन सुट्या देण्यात आल्या आहेत. शासनाकडून दिवाळीच्या सुट्या २८ ऑक्टोबरपासून अचानक घोषित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागातील शाळांत सुरू झालेल्या प्रथम सत्र परीक्षा अर्धवट सोडाव्या लागल्या होत्या. आता पुन्हा शिल्लक राहिलेली परीक्षा शाळा सुरू झाल्यावर घेण्यात येणार आहेत.

प्राथमिक शाळांना अद्यापही ‘ब्रेक’च
- दिवाळीनंतर पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू होणार असे संकेत मिळाले होते. तशी शासनाकडून शक्यता वर्तविण्यात आली होती. प्राथमिक शाळा पुन्हा गजबजणार असे माध्यमांद्वारे सांगण्यात आले. परंतु प्राथमिक शाळा सुरू करण्याचे कोणतेही निर्देश आले नसल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांनी सांगितले. मागील वर्षी सुद्धा या परिसरात अज्ञात इसमांनी धानाच्या पुंजण्याला आग लावून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले होते. त्या प्रकरणातील आरोपी अजूनपर्यंत मिळालेले नाहीत. याच संधीचा फायदा घेत यावर्षी पुन्हा अज्ञात आरोपींनी एका वेळेस ३३ एकरातील पिकाला आग लावली. आरोपींचा शोध लागला नाही तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीवर परिसरातील शेतकरी बहिष्कार घालतील असा इशारा दिला आहे.

 

Web Title: The second academic session of the school starts from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.