जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही काेराेना रुग्णांची संख्या हजाराचा वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:37 AM2021-04-09T04:37:32+5:302021-04-09T04:37:32+5:30

गुरुवारी जिल्ह्यात तीन मृत्यू झाले असून त्यात भंडारा तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तुमसर ...

On the second day in the district, the number of Kareena patients was over a thousand | जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही काेराेना रुग्णांची संख्या हजाराचा वर

जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही काेराेना रुग्णांची संख्या हजाराचा वर

Next

गुरुवारी जिल्ह्यात तीन मृत्यू झाले असून त्यात भंडारा तालुक्यातील ५८ वर्षीय पुरुषाचा नागपूर येथील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तुमसर तालुक्यातील ६२ वर्षीय महिलेचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला तर लाखांदूर तालुक्यातील ६६ वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वाॅर्डात मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ७५२५ ॲक्टीव्ह रुग्ण असून त्यात भंडारा तालुक्यात ३१४०, माेहाडी ८६८, तुमसर १०४६, पवनी ९५५, लाखनी ७९८, साकाेली ४२४, लाखांदूर तालुक्यात २९४ रुग्ण आहेत.

बाॅक्स

भंडारा तालुक्यात रुग्णांची संख्या दहा हजार पार

जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात त्यातही भंडारा शहरात आढळत आहेत. भंडारा तालुक्यात आतापर्यंत १० हजार ५०८ व्यक्तींना काेराेनाची लागण झाली हाेती. तर माेहाडी तालुक्यात २११९, तुमसर ३२१२, पवनी २७६६, लाखनी २६५५, साकाेली २३३७, लाखांदूर १००७ व्यक्तींना काेराेनाची लागण झाली आहे.

Web Title: On the second day in the district, the number of Kareena patients was over a thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.