उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकची धडक
By admin | Published: May 7, 2016 12:58 AM2016-05-07T00:58:37+5:302016-05-07T00:58:37+5:30
बोअरवेल मशीनच्या उभ्या ट्रकला ओव्हरटैक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली.
खापा शिवारातील घटना : चालकवाहक फरार
तुमसर : बोअरवेल मशीनच्या उभ्या ट्रकला ओव्हरटैक करणाऱ्या दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिली. यात दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाला. नशीब बलवत्तर म्हणून दोन्ही ट्रकचे चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. धडक मारणाऱ्या ट्रकचे चालक व क्लिनर अपघात स्थळावरुन पसार झाले हा अपघात तुमसर-भंडारा राज्य महामार्गावर खापा शिवारात गुरुवारी मध्यरात्री घडला.
खापा शिवारात रस्त्याच्या बाजूला बोअरवेल ट्रक के ए ०१-ए ए ६२१८ उभा होता. भंडाऱ्याकडून येणारा दुसरा ट्रक सीजी १० आर १६२४ ओव्हरटेक करताना बोअरवेल च्या उभ्या ट्रकला धडक मारली. यात दोन्ही ट्रकचा चेंदामेंदा झाला. धडक मारणाऱ्या ट्रकचे चालक व क्लिनर थोडक्यात बचावले. धडक मारल्यानंतर ट्रकचा चालक व क्लिनर घटनास्थळावरुन पसार झाले
मध्यरात्री तुमसर-भंडारा मार्गावरील वाहतुक काही वेळ विस्कळीत झाली होती. काचांचा खच रस्त्यावर पडून होता. तुमसर -भंडारा राज्य महामार्गावरील खापा गाव शिवारात तथा खापा-देव्हाडी मार्गावर ट्रक रस्त्याच्या शेजारी मोठ्या संख्येने उभे असतात. यामुळे वाहतूकीस मोठा अडथळा निर्माण होतो. रात्रीच्या सुमारास ट्रकांचे वाहनतळ आहे असे चित्र येथे दिसते. पोलीस प्रशासनाने तासनतास उभ्या वाहनांवर कारवाईची गरज आहे.
या उभ्या ट्रकमुळेच रात्री येथे अपघात झाला. रात्री खापा चौकात कायमस्वरुपी पोलिसांची पथक असणे गरजेचे आहे. (तालुका प्रतिनिधी)