काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीला 15 काेटींचा ताेटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 05:00 AM2021-08-18T05:00:00+5:302021-08-18T05:00:25+5:30
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेताे. भंडारा, साकाेली, तुमसर, पवनी, गाेंदिया आणि तिराेडा हे सहा आगार आहेत. या सहा आगारांतर्गत ३६७ बस धावतात. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीचे चाक जागावर थांबले. १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद हाेती. विशेष म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने लग्नसराईचे आहेत. या काळात एसटी महामंडळाला प्रति दिवशी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न हाेते; परंतु काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत या काळात ४५ दिवस बस बंद हाेती.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ऐन लग्नसराईच्या हंगामातच काेराेनाची दुसरी लाट आली. तब्बल ४५ दिवस एसटीचे चाक थांबले. या काळात प्रति दिवशी ३५ लाखांप्रमाणे एसटीच्या भंडारा विभागाला १५ काेटी ७५ लाख रुपयांचा ताेटा झाला. महामंडळाची बस सुरू झाली तरी वेग पकडायला मात्र आणखी बराच अवधी लागणार आहे. या ताेट्यामुळे महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दाेन महिन्यांपासून वेतन रखडले आहे.
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश हाेताे. भंडारा, साकाेली, तुमसर, पवनी, गाेंदिया आणि तिराेडा हे सहा आगार आहेत. या सहा आगारांतर्गत ३६७ बस धावतात. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत एसटीचे चाक जागावर थांबले. १५ एप्रिल ते १ जूनपर्यंत प्रवासी वाहतूक पूर्णत: बंद हाेती. विशेष म्हणजे एप्रिल, मे आणि जून हे तीन महिने लग्नसराईचे आहेत. या काळात एसटी महामंडळाला प्रति दिवशी ३५ लाख रुपयांचे उत्पन्न हाेते; परंतु काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत या काळात ४५ दिवस बस बंद हाेती.
परिणामी, एसटी महामंडळाला १५ काेटी ७५ लाख रुपयांचा ताेटा झाला. आता ३६७ बसपैकी २९३ बस धावत आहे. प्रति दिवशी ९० हजार किलाेमीटरचे अंतर कापत आहे. मात्र, काेराेनाच्या ४५ दिवसांतील ताेटा भरून काढण्यासाठी बराच कालावधी लागणार आहे. एसटी महामंडळाला काेराेनाने फटका बसला. आता डिझेलचा दरवाढीचाही माेठा फटका बसत आहे.
दरराेज लागते १७ लाखांचे डिझेल
काेराेनानंतर एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. सध्या भंडारा आगारातील बस दर दिवशी ९० हजार किमी चालतात. त्यासाठी सरासरी १८ हजार लिटर डिझेल लागते. डिझेलचे दर ९८ रुपये प्रति लिटर असून दरराेज महामंडळाला १७ लाख ६४ हजार रुपये डिझेलसाठी खर्च करावे लागत आहेत. उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था सध्या आहे.
दाेन महिन्यांपासून पगार नाही
एसटी महामंडळाची बस धावायला लागली असली तरी दाेन महिन्यांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पगारच झाला नाही. आधीच चालक वाहकांना कमी वेतन त्यात आता दाेन महिन्यांपासून वेतनच नसल्यामुळे कुटुंबाचा गाडा हाकणे माेठे कठीण झाले आहे. आता वेतन कधी हाेणार, याची प्रतीक्षा आहे.
डिझेल दर वाढले, तिकीट मात्र तेच
- आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन दरवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसत आहे. ६० रुपये प्रति लिटर डिझेलचे दर हाेते, तेव्हा तिकिटाचे दर हाेते तेवढेच आताही आहेत. उलट डिझेलचे दर ६० रुपयांवरून ९८ रुपयांवर पाेहाेचले आहे. दाेन वर्षांत तिकिटांचे दर मात्र वाढले नाही. डिझेलच्या वाढत्या दराचे गणित उत्पन्नाशी निगडित असून यामुळे सर्वाधिक ताेटा महामंडळाला सहन करावा लागत आहे.
भंडारा विभागात एसटी बस सुरू झाले आहे. प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद आहे. लग्नसराईच्या काळात बंद असलेल्या बसेसचा फटका महामंडळाला बसला आहे. प्रवाशांनी सुरक्षित प्रवाशासाठी एसटीनेच प्रवास करावा.
- डाॅ. चंद्रकांत वडसकर
विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा