आॅलिम्पिकचे स्वप्न बघा
By admin | Published: August 2, 2016 12:34 AM2016-08-02T00:34:15+5:302016-08-02T00:34:15+5:30
खेळ हे जीवन असून आनंद देते. खेय आज रोजगार उपलब्ध करून देणारे साधन आहे.
जिल्हा क्रीडा अधिकारी बिले : तुमसरात तालुका क्रीडा शिक्षकांची बैठक
तुमसर : खेळ हे जीवन असून आनंद देते. खेय आज रोजगार उपलब्ध करून देणारे साधन आहे. खेळ स्पर्धेत सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय आॅलिम्पीकचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शारीरिक शिक्षक व खेळाडूंनी आॅलिम्पीकचे स्वप्न बघावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.
स्थानिक न.प. कस्तुरबा विद्यालयात आयोजित शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, मुख्याध्यापक प्रकाश वंजारी, क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, ए.बी. मरसकोल्हे, मनोज पंधराम, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, मुख्याध्यापक राजेंद्र पडोळे, क्रीडा मार्गदर्शक सुभाष पडोळे उपस्थित होते.
तालुका स्तरावरील स्पर्धेत दहा क्रीडा प्रकार तर जिल्हा स्तरावर ८५ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी खेळ स्पर्धा आयोजित करत आहे. शाळेला उत्कृष्ट खेळ प्रदर्शनाकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त होते. खेळाडूंना नोकरीच्या संधी आज उपलब्ध आहेत. खेळ व स्पर्धेविषयी सात वेळा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन शारीरिक शिक्षकांना केले. क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, ए.बी. मरसकोल्हे, मनोज पंधराम, भोजराज चौधरी, मुख्याध्यापक प्रकाश वंजारी, राजेंद्र कडव यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.शारीरिक शिक्षकांनी यावेळी स्पर्धेतील अडचणी यावेळी मांडल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कडव, प्रास्ताविक चंद्रकांत भट तर आभार सुधाकर कहालकर यांनी मानले. बैठकीचे आयोजन तालुका क्रीडा संयोजक उमेश भेलावे यांनी केले. तत्पूर्वी संगीत शिक्षक सागर गणोकर यांच्या मार्गदर्शनात कस्तुरबा शाळेतील विद्यार्थिनींनी सुरेल स्वागतगीत सादर केले. बैठकीला तालुक्यातील मोठ्या संख्येने क्रीडा शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)