उन्हाळी हंगामाकरिता धान उत्पादकांना बीज प्रक्रियेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:18 AM2020-12-28T04:18:46+5:302020-12-28T04:18:46+5:30

चुलबंद खोऱ्यात बारमाही शेती कसली जाते. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. उत्पादन खर्च वाढत चालल्याने शेतकऱ्यांचा नफा ...

Seed processing lessons for paddy growers for the summer season | उन्हाळी हंगामाकरिता धान उत्पादकांना बीज प्रक्रियेचे धडे

उन्हाळी हंगामाकरिता धान उत्पादकांना बीज प्रक्रियेचे धडे

Next

चुलबंद खोऱ्यात बारमाही शेती कसली जाते. दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे. उत्पादन खर्च वाढत चालल्याने शेतकऱ्यांचा नफा कमी होत आहे. यातून शेतकरी वर्गांना मार्गदर्शन करण्यासाठी बीज प्रक्रिया प्रात्यक्षिकातून थेट शेतकरी मार्गदर्शन करण्यात येत आहे. शेती अधिक नफ्याची व्हावी. याकरिता मंडळ कृषी अधिकारी गणपती पांडेगावकर आपल्या चमूसह शेतकऱ्यांना नियमित मार्गदर्शन करीत आहेत.

धानाचे बियाणे धानाच्या चार पट महाग असते. यात शेतकरी वर्गाला मोठा खर्च येतो. हा खर्च कमी व्हावा, या हेतूने मंडळ कृषी कार्यालय पालांदूर यांनी मोहीम सुरु केली आहे. शेतकऱ्यांच्या घरी जात त्यांना बीज प्रक्रिया स्वतःच्या उपस्थितीत समजून सांगत त्यांना शहाणे करण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे. याचा प्रात्यक्षिक पालांदूर येथील प्रगतशील शेतकरी तथा बागायतदार बळीराम जयराम बागडे यांच्या घरी १५ शेतकऱ्यांच्या उपस्थित बीज प्रक्रिया कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी सुखदेव भुसारी, पुरुषोत्तम भुसारी, सुखराम मेश्राम वाकल, प्रभाकर कडूकार, मोहन लांजेवार, गोकुळ राऊत, फत्तु राऊत, केजाजी राऊत, मुखरू बागडे, दिलीप राऊत, थालीराम नंदुरकर, प्रगतशील शेतकरी बावने वाकल, शेतकरी हजर होते. कृषी सहाय्यक शेखर निर्वाण यांनी धानाचे बियाणे बीजप्रक्रीया दाखवली. यावेळी शेतकरी वर्गातून प्रभाकर कडूकार व सुखदेव भुसारी यांनी शंका जाणून घेतल्या. कृषी केंद्रातून महागडे बियाणे घेण्यापेक्षा घरातीलच खरिपाचे बियाणे काळजीपूर्वक ठेवून बीज प्रक्रिया करण्याचा नियोजन केले. कृषी अधिकाऱ्यांनी थेट भेट देत बीज प्रक्रिया ची पद्धत समजावून सांगितली व करून दाखवली. पालांदूर येथील शेतकरी बळीराम बागडे यांनी आमच्या पारंपरिक ज्ञानाला चालना मिळालीअसल्याचे सांगितले. २७ लोक ०४ के

कोट

शेतकऱ्यांनी शास्त्रशुद्ध, अभ्यासपूर्ण कमी खर्चाची व्यवस्थित शेती करावी. तुमच्या हाकेला आमचा प्रतिसाद आहे. तुमच्या प्रयत्नाला आमचे सहकार्य आहे. पेरणी करण्यापूर्वी बीज प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.शासनाने दिलेल्या विविध योजनांची माहिती ची जाणीव तुम्हाला व्हावी. त्यातून तुमचा सर्वांगीण विकास व्हावा. हीच शासनाची व आमची भूमिका आहे.

गणपती पांडेगावकर मंडळ कृषी अधिकारी पालांदूर.

Web Title: Seed processing lessons for paddy growers for the summer season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.