ग्रामविकासासाठी संधीचे सोने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:43 AM2021-02-05T08:43:28+5:302021-02-05T08:43:28+5:30

विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले, गावातील मतदारांनी आपणावर विश्वास दाखवित गावविकासाची संधी दिली आहे. या संधीचा फायदा घेताना प्रत्येकाने मतदारांच्या ...

Seize the opportunity for rural development | ग्रामविकासासाठी संधीचे सोने करा

ग्रामविकासासाठी संधीचे सोने करा

Next

विधानसभा अध्यक्ष पटोले म्हणाले, गावातील मतदारांनी आपणावर विश्वास दाखवित गावविकासाची संधी दिली आहे. या संधीचा फायदा घेताना प्रत्येकाने मतदारांच्या मताचा आदर ठेवून गावविकासाकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने गावातील प्रभागनिहाय विकासाचे नियोजनाला प्राधान्य दिले पाहिजे. तथापि, केवळ सार्वजनिक विकासावरच लक्ष न ठेवता गावातील शेवटच्या घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना गावात राबविल्या गेल्या पाहिजेत. एकूणच सर्वांनी एकजुटीने गावविकासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या सत्कार कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भंडारा जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष रमेश डोंगरे, मनोहर राऊत, मोहन पंचभाई, तालुकाध्यक्ष वासुदेव तोंडरे, तहसीलदार निवृत्ती उइके, कृउबास संचालक डॉ. सुरेश ब्राह्मणकर, सभापती सुभाष राऊत, सुभाष राऊत, जेसा मोटवानी, इंजि. विजय मेश्राम, माजी न.प. गटनेते रामचंद्र राऊत, प्रदीप बुराडे, प्रा. पी.एम. ठाकरे, संजय भोवते, संतोष शिवनकर, प्रकाश(पा) देशकर, लता प्रधान, नीलिमा टेंभुर्णी, प्रकाश देशमुख, लेकराम ठाकरे, बंटी सहजवानी, बालकिशन गोडसेलवार, मुनेश्वर दिवठे, तुलशीदास खरकाटे, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष जितेंद्र पारधी, मिलिंद सिंहगडे, सुनील कुत्तरमारे, मंगेश राऊत, नीळकंठ पारधी यासह बहुसंख्य महिला, पुरुष व युवक पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते तालुक्यातील ११ ग्रामपंचायतींचे नवनिर्वाचित ९९ सदस्यांचा शाल, श्रीफळ व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता विजय मेश्राम यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवित कॉंग्रेस पक्षात प्रवेश करून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रियता दाखविली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन तालुका कॉंग्रेसचे समन्वयक उत्तम भागडकर यांनी केले.

Web Title: Seize the opportunity for rural development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.