२२ हजारांचा देशीदारु साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:35 AM2021-05-26T04:35:24+5:302021-05-26T04:35:24+5:30
लाखांदूर : शेतशिवारात देशी दारुचा अवैधरीत्या साठा करुन विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन लाखांदूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २२ हजार ...
लाखांदूर : शेतशिवारात देशी दारुचा अवैधरीत्या साठा करुन विक्री करीत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन लाखांदूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत २२ हजार ५०० रूपयांचा देशी दारु साठा जप्त केल्याची घटना घडली. सदर घटना गत २४ मे रोजी ५ वाजताच्या सुमारास तालुक्यातील दोनाड येथील शेतशिवारात घडली. तुलाराम मानिक बुराडे (४२) रा. दोनाड असे घटनेतील अवैध देशी दारु बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
पोलीस सूत्रानुसार, घटनेच्या दिवशी कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर तालुक्यातील सर्व देशी विदेशी दारुची दुकाने बंद पाडण्यात आल्याने काही मद्यपींनी दारुची साठेबाजी चालविल्याची माहिती पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानुसार घटनेच्या दिवशी लाखांदूर पोलिसांना घटनेतील आरोपीने शेतशिवारात अवैधरीत्या देशी दारुची साठेबाजी केल्याची गोपनीय माहिती देण्यात आली. लाखांदूर पोलिसांनी धाड टाकून पंचासमक्ष केलेल्या झाडाझडतीत आरोपीच्या शेतातून २२ हजार ५०० रुपये किमतीचा अवैधरीत्या देशी दारु साठा आढळून आल्याने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार मनोहर कोरेट्टी यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम करीत आहेत.
===Photopath===
250521\img-20210525-wa0024.jpg
===Caption===
अवैध दारुसाठ्या विरोधात कारवाई करतांना लाखांदुर पोलीस