महसूल प्रशासनाकडून ६ दिवसांनंतर जप्त रेतीची उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:23 AM2021-06-23T04:23:42+5:302021-06-23T04:23:42+5:30
काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभरी, विहीरगाव, नदीघाट परिसरात तालुक्यातील काही रेती तस्करांकडून नदीपात्रातून अवैधरीत्या रेती खासगी शेतशिवारात साठवणूक केली जात ...
काही दिवसांपासून तालुक्यातील टेंभरी, विहीरगाव, नदीघाट परिसरात तालुक्यातील काही रेती तस्करांकडून नदीपात्रातून अवैधरीत्या रेती खासगी शेतशिवारात साठवणूक केली जात आहे. या अवैध रेतीसाठ्याची स्थानिक महसूल प्रशासनाला माहिती मिळताच लाखांदूरचे तहसीलदार अखिल भारत मेश्राम यांच्या नेतृत्वात टेंभरी व विहीरगाव नदीघाट क्षेत्रात जवळपास १२० ब्रॉस रेतीसाठा जप्त करण्यात आला होता. रेतीसाठा करणाऱ्यांविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई न केल्याने जप्त रेतीची रेती तस्करांकडून चोरी होण्याची शक्यता वर्तविली जात होती.
बॉक्स :
रेती तस्करांविरोधात फौजदारी कारवाई आवश्यक
तालुक्यातील काही रेती तस्करांकडून टेंभरी, विहीरगाव नदीघाटातून पोकलँड मशीन व टिप्परने करोडो रुपये किमतीच्या रेतीची तस्करी केली होती. रेती तस्करीला नागरिकांकडून विरोध होऊ नये यासाठी लाखोंचे लालच दिले जात असल्याची चर्चा रंगत आहे. रेती तस्करांविरोधात कोणतीच फौजदारी कारवाई न करण्यात आल्याने तालुक्यातील नागरिकांत महसूल प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे. त्या रेती तस्करांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
===Photopath===
220621\img-20210622-wa0023.jpg
===Caption===
अवैध रेतीसाठ्यावर कारवाई करतांना नायब तहसिलदार देविदास पाथोडे व अन्य कर्मचारी