निवड श्रेणी, वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे निकाली निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:42 AM2021-02-05T08:42:06+5:302021-02-05T08:42:06+5:30
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. या समस्येला घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ...
भंडारा : जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांच्या समस्या प्रलंबित आहेत. या समस्येला घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे, शिक्षणाधिकारी मनोहर बारस्कर यांच्याशी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. यावेळी प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे संघटनेच्या वतीने करण्यात येणारे उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे संलग्नित असलेल्या अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा शिक्षणाधिकारी यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी निवड श्रेणी ज्ञाणि वरिष्ठ श्रेणीची प्रकरणे, विज्ञान शिक्षकांची समस्या आणि अधिसंख्य शिक्षक आणि इतर समस्या यांचे प्रश्न तत्काळ स्वरूपात मार्गी लावावीत, अशी मागणी शिष्टमंडळाने लावून चालली. यासंदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांनी ही प्रकरणे १२ फेब्रुवारीपर्यंत मार्गी लावण्याचे आश्वासन संघटनेला दिले. तसेच उपोषण करू नये, असे सांगितल्याने संघटनेतर्फे पुकारण्यात आलेले उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले आहे. तसेच अनुकंपा भरती प्रक्रियेमुळे समस्या सोडविण्यात विलंब झाल्याचे सांगितले. चर्चेदरम्यान याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, ज्ञानेश्वर दमाहे, जिल्हा परिषद व पंचायत समिती शासकीय सह. पतसंस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, श्रावण लांजेवार, सुनील निनावे, विजय चाचेरे, केशव अतकरी, संजय झंझाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.